Video | बापरे ! केस कापण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा वापर, व्हिडीओ एकदा पाहाच

चक्क चाकू, हातोडा आणि आगीच्या माध्यमातून केसांना सजवणारा एक न्हावी पाकिस्तानमध्ये आहे. (pakistan lahore barber haircut video )

Video | बापरे ! केस कापण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा वापर, व्हिडीओ एकदा पाहाच
अली अब्बास हेअरकट करण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा उपयोग करतो.
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:06 PM

लाहोर : प्रत्येकाला आपल्या केसांवर अपार प्रेम असते. आपला लूक आकर्षक करण्यासाठी अनेक जण केसांना वेगवेगळे आकार देतात. चांगला हेअर स्टायलिस्ट भेटला तर आकर्षक हेअर स्टाईलसाठी अनेकजण हजारोंनी पैसे खर्च करतात. मात्र, एखादा कारागीर हातोडा आणि चाकूने तुमचे केस कापत असेल तर?, ही कल्पनाजरी केली तरी अंगाला घाम फुटेल. पण चक्क चाकू, हातोडा आणि आगीच्या माध्यमातून केसांना सजवणारा एक हेअर स्टयलिस्ट पाकिस्तानमध्ये आहे. केस कापण्याची त्याची ही कला सध्या चर्चेचा विषय ठरतेय. (Pakistan Lahore barber Ali Abbas use hammer knife and fire to cut hair video goes viral)

केस कापण्यासाठी चाकू, हातोड्याचा उपयोग

पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एक हेअर ड्रेसर केस कापण्यासाठी हातोडा, कुऱ्हाड आणि चाकूचा उपयोग करतो. एवढंच नाही तर वेगवेगळा आकार देण्यासाठी तो केसांना चक्क आग लावतो. अली अब्बास असं या हेअर ड्रेसरचं नाव आहे. केस कापण्याची ही खतरनाक कला सर्वांना पहिल्यांदा भीतीदायक वाटते. मात्र, केसांना चांगला आकार मिळाल्यानंतर सगळे आली अब्बासच्या या कलेच्या प्रेमात पडतात. पाकिस्तानी माध्यमानेसुद्धा अलीच्या या कामाची दखल घेतली आहे. ARY Stories नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अली अब्बासचा असाच एक व्हिडीओ करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांकडून चांगलाच पसंद केला जातोय.

अली अब्बासच्या केस कापण्याच्या अनोख्या शैलीचा हा व्हीडओ नक्की पाहा

रोज काहीतरी शिकण्यासाठी करतो नवनवे प्रयोग

ARY Stories या यूट्यूब चॅनलेवर हेअर ड्रेसर अली अब्बासने त्याच्या या केस कापण्याच्या कलेविषयी अधिक माहिती दिली आहे. “मी रोज काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतो. कोणतंही काम मनापासून केलं तर त्यात यश मिळतं. हा उद्देश समोर ठेवून केस कापण्याच्या विविध कला मी अवगत केल्या आहेत,” असं अली अब्बास सांगतो.

अली जेव्हा धारदार चाकू, हातोडा, किंवा आग लावून केसांना आकार देतो, तेव्हा सुरुवातीला सगळ्यांनाच भीती वाटते. मात्र, अब्बास या कामात निपूण असल्यामुळे नंतर लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो. एकदा त्याच्याकडे हेअर ड्रेसींग केल्यानंतर अनेकजण पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जातात.

दरम्यान अली अब्बासची हेअ कट करण्याची पद्धत सर्वांना चांगलीच आवडते आहे. यूट्यूवर अपलोड झालेल्या या व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळत आहेत.

इतर बातम्या :

वजन कमी करण्यासाठी आवडते खाद्य पदार्थांना सोडण्याची गरज नाही, फक्त ‘या’ टिप्स फाॅलो करा

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

VIDEO | एक्स्प्रेस ट्रेन गायीला धडकली आणि उलटी धावायला लागली, प्रवाशांमध्ये घबराट; लोकोपायलट निलंबित

(Pakistan Lahore barber Ali Abbas use hammer knife and fire to cut hair video goes viral)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.