Pakistan vs Afghanistan: दोन्ही देशांच्या प्रेक्षकांची एकमेकांना स्टेडिअममध्ये हाणलं, खुर्च्यांनी दे दणादण

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात काल मॅच झाली. यामध्ये पाकिस्तान ही मॅच जिंकलं. अफगाणिस्तानला हार पत्करावी लागली. या मॅचनंतर एक घटना घडली त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Pakistan vs Afghanistan: दोन्ही देशांच्या प्रेक्षकांची एकमेकांना स्टेडिअममध्ये हाणलं, खुर्च्यांनी दे दणादण
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 2:46 PM

मुंबई : अनेकदा मैदानातील खेळापेक्षा तिथे घडणाऱ्या बाबी लक्ष वेधून घेतात. आताही असाच एक व्हीडिओ चर्चेचा विषय बनलाय. प्रेक्षक गॅलरीत अनेकदा अश्या गोष्टी घडतात की त्यामुळे मॅच इतकंच प्रेक्षक गॅलरी सर्वांच लक्ष वेधून घेते. सध्या आशिया चषक (Asia Cup 2022 ) सुरु आहे. ही मॅच अंगावर रोमांच आणणारी आहे. पण आता एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. त्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात काल मॅच झाली. यामध्ये पाकिस्तान ही मॅच जिंकलं. अफगाणिस्तानला हार पत्करावी लागली. या मॅचनंतर एक घटना घडली त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

प्रेक्षक गॅलरीमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट रसिकांना प्रेक्षक गॅलरीमध्ये मारहाण झाली. या मारहाणीचा व्हीडिओ पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने ट्विटरवर शेअर केला आहे.

माराहाणीदरम्यान खुर्च्यांनी एकमेकांना मारण्यात आलं. क्रिकेटच्या मैदानातील हार जिव्हारी लागल्याने ही तुंबळ हाणामार झाली. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहजाहच्या स्टेडियममध्येच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये तुंबळ मारहाण झाली. आधी बाचाबाचीपासून सुरु झालेली नंतर मारहाणीत रुपांतरीत झाली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमधील हे खुर्ची वॉर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंत.

ही सगळी मारहाण कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली आहे. अन् आता तुमच्या माझ्या मोबाईलपर्यंत पोहोचली आहे.