
भारताच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानचे अनेक व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात, पण त्यातील मोजकेच व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून लोकांना शेअर केल्याशिवाय राहता येत नाही. दोन महिन्यांपूर्वी एका पाकिस्तानी मुलीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, तिने आपल्या डान्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सने लोकांची मने जिंकली होती. सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक व्हिडिओ खळबळ माजवत आहे. पाकिस्तानी मुलीने पंजाबी गाण्यावर असा जलवा दाखवला की भारतीय मुलं तिचे फॅन झाले.
इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या पाकिस्तानी मुलीला पाहून लोक तिचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाहीत. या पाकिस्तानी व्हायरल मुलीचे नाव अरिका हक (Areeka Haq) असून तिचे इन्स्टाग्रामवर साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हा व्हिडिओ पोस्ट होऊन जवळपास एक महिना झाला असला तरी आता याची अधिक चर्चा होऊ लागली कारण पाकिस्तानी मुलीची ही स्टाईल आता इंटरनेटवर आपली जादू पसरवत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मि अमोर.”
या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणखी एका युजरने लिहिले की, ‘काश फाळणी झाली नसती आणि १९४७ चे दु:ख अजूनही आहेच. एका भारतीय माणसाने गंमतीने म्हटले, “परीक्षा येत आहेत आणि तुम्ही माझे लक्ष विचलित करत आहात.”