वाह पंडितजी वाह! हा मंत्र ऐकून तुम्ही बाकी सगळे मंत्र विसरून जाल

पंडितजींनी गाडीच्या पूजेसाठी नव्या युगातील मंत्र उच्चारला, जो तुम्ही यापूर्वी ऐकला नसेल. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

वाह पंडितजी वाह! हा मंत्र ऐकून तुम्ही बाकी सगळे मंत्र विसरून जाल
new mantra
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 15, 2022 | 10:39 AM

जेव्हा जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो तेव्हा तेव्हा ती आपण मंदिरात नेऊन पूजा करतो. वास्तविक, बहुतेक लोक वाहनांना भगवान विश्वकर्माचे वाहक मानतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे आवश्यक मानतात. यामुळे गाडी खरेदी केल्यानंतर ते मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. त्याचबरोबर पंडितजीही मंत्रोच्चाराने गाडीची पूजा करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. पंडितजींनी गाडीच्या पूजेसाठी नव्या युगातील मंत्र उच्चारला, जो तुम्ही यापूर्वी ऐकला नसेल. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओत पाहू शकता की, एक व्यक्ती आपली नवी बाईक खरेदी केल्यानंतर मंदिरात घेऊन गेला आणि त्यानंतर पंडितजींना पूजा करण्यासाठी बोलावले.

पंडितजींनी नारळासह अनेक वस्तू आणायला सांगितल्या. पंडितजी पूजेच्या सर्व वस्तू घेऊन मंत्रोच्चार सुरू करतात.

मात्र, पंडितजींचे मंत्र ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच हसू येईल. यानंतर गाडीकडे बोट दाखवत पंडितजींनी नव्या युगातील मंत्राचा उच्चार केला आणि म्हणाले, “खूप शांतपणे जगा, अधिक मायलेज द्या आणि मोबिल कमी खा.” “दुस-याला मारत, स्वत:ला ठोकू नकोस. पटकन पंक्चर होऊ नका. अधूनमधून हवा भरत राहा.”

हा मंत्र थोड्याशा भोजपुरी भाषेत बोलला गेला. काही दिवसांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. mahishasur_akki नावाच्या अकाऊंटने तो शेअर केला असून आता सर्व ट्रोलिंग अकाउंटवर शेअर केला जात आहे.

आतापर्यंत या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली. मात्र, काही लोकांनी हा व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहिला आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडलं.

एका युझरने लिहिले की, “हा पंडित नाही. आणखी एकजण म्हणाला, “ते दुस-याचा ऑडिओ इथे टाकून मूर्ख बनवत आहेत.” तर अ