Christine Dacera | एअरहॉस्टेस गँगरेप-हत्या प्रकरणात ट्विस्ट, बाराही संशयित ‘गे’ असल्याचा दावा

| Updated on: Jan 22, 2021 | 3:17 PM

एअर हॉस्टेसचा मृतदेह न्यू इयर पार्टीनंतर एका हॉटेलच्या बाथटबमध्ये सापडला होता. (Philippine Air Stewardess Gang Rape)

Christine Dacera | एअरहॉस्टेस गँगरेप-हत्या प्रकरणात ट्विस्ट, बाराही संशयित गे असल्याचा दावा
Follow us on

मनिला : फिलिपाईन्समधील एअर हॉस्टेसच्या बहुचर्चित गँगरेप आणि हत्या प्रकरणाला (Philippine Air Stewardess alleged Gang Rape Murder Case) वेगळेच वळण लागले आहे. ख्रिस्टिना डकेरा (Christine Dacera) या एअर हॉस्टेसचा मृतदेह न्यू इयर पार्टीनंतर एका हॉटेलच्या बाथटबमध्ये सापडला होता. पोलिसांनी तातडीने ही सामूहिक बलात्कार आणि हत्येची केस असल्याचा निष्कर्ष काढत तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या. परंतु या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आल्याने पोलिसावरच निलंबनाची कारवाई झाली आहे. मयत ख्रिस्टिनासोबत पार्टीत सहभागी बाराही पुरुष समलिंगी असल्याची माहिती समोर येत आहे. (Philippine Air Stewardess Christine Dacera alleged Gang Rape Murder Case)

एअर हॉस्टेस बाथटबमध्ये मृतावस्थेत

फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये नवीन वर्षानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 23 वर्षीय एअर हॉस्टेस ख्रिस्टिना डकेरा बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. ख्रिस्टिना डकेरावर गँगरेप आणि हत्या झाल्याचा निष्कर्ष घाईघाईने काढत पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती. त्या रात्री ख्रिस्टिनासोबत बारा पुरुष संशयाच्या भोवऱ्यात होते.

सोशल मीडियावर जनक्षोभ

4 जानेवारीला पोलिसांनी पत्रक काढत एअर हॉस्टेस ख्रिस्टिना डकेरा केस सोडवल्याचा दावा केला होता. तिच्यावर गँगरेप करुन हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला होता. ख्रिस्टिनाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात होती. इतक्या पुरुषांसोबत पार्टी केल्याबद्दल तिच्याविषयी खालच्या दर्जीची टिप्पणीही झाली.

बाराही पुरुष समलिंगी

पार्टीत सहभागी उर्वरित नऊ जणांनी 72 तासांच्या आत सरेंडर करावं, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला होता. तीन संशयितांपैकी ग्रेगोरिओ दे गुझमन (Gregorio de Guzman) याने एबीएस-सीबीएन न्यूजला (ABS-CBN news) दिलेल्या मुलाखतीनंतर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्या पार्टीत सहभागी बाराही पुरुष गे असल्याचा दावा गुझमनने केला.

पोलीस तपास संशयाच्या भोवऱ्यात

ख्रिस्टिनाने आम्हा बाराही जणांसोबत पार्टीत आनंद घेतला. ती आमच्यासोबत म्हणजेच एलजीबीटी समुदायासोबत कम्फर्टेबल होती, असंही गुझमन म्हणाला. तोपर्यंत आलेल्या वैद्यकीय अहवालात ख्रिस्टिनावर लैंगिक अत्याचार झाल्याचा पुरावा सापडला नाही. त्यामुळे तिघा संशयितांना पुराव्याअभावी सोडण्यात आलं. पोलिसांनी मानसिक छळ करुन पार्टीत ड्रग्ज वापरल्याचं स्टेटमेंट देण्यास आम्हाला भाग पडले, असा दावा अन्य दोघा संशयितांनी केला. (Philippine Air Stewardess Christine Dacera alleged Gang Rape Murder Case)

ख्रिस्टिनाचा मृत्यू मेंदूतील गाठीमुळे

वैद्यकीय अहवालात ख्रिस्टिनाचा मृत्यू मेंदूतील गाठीमुळे (brain aneurysm) झाल्याचं समोर आलं आहे. ख्रिस्टिना मृत्यू प्रकरणाच्या तपास हलगर्जी बाळगल्याबद्दल मकाटीचे पोलीस प्रमुख कर्नल हॅरॉल्ड डिपोझिटर (Colonel Harold Depositar) यांना हटवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत पोलीस उपाधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आरोपाने खळबळ

परराज्यातून आलेल्या अल्पवयीन तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

(Philippine Air Stewardess Christine Dacera alleged Gang Rape Murder Case)