ना डोक्याखाली उशी, ना अंगावर चादर, तरीही शांतपणे झोप; कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या आमदाराचा ‘हा’ फोटो पाहाच

| Updated on: May 06, 2021 | 12:20 AM

1 हजार बेडचं कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारल्यानंतर आता निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. (ncp mla nilesh lanke covid center)

ना डोक्याखाली उशी, ना अंगावर चादर, तरीही शांतपणे झोप; कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या आमदाराचा हा फोटो पाहाच
NILESH LANKE
Follow us on

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यात सध्या हाहा:कार उडाला आहे. राज्यात हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, औषधी कमी पडत असताना अनेकजण मदतीसाठी सरसावत आहेत. अनेकजण सढळ हाताने सरकारला मदत करत आहेत. मदतीच्या या महायतज्ञात अग्रक्रमाने राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचं नाव घेतलं जातंय. 1 हजार बेडचं कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारल्यानंतर आता लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. (photo of NCP MLA Nilesh Lanke sleeping with Corona patient in covid center goes viral on social media)

निलेश लंकेंचा कोविड सेंटरमध्येच मुक्काम

कोरोनाग्रस्तांना योग्य उपचार मिळावा म्हणून निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने तब्बल 1 हजार बेड्सचे कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारले. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे कोविड सेंटर आहे. लंके यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये जेवणाची तसेच उपचाराची सोय आहे. याच कोविड सेंटरमुळे लंके यांची संपूर्ण महाराष्ट्रमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला आहे. तसा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस अपेटड्स या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

निलेश लंके सामान्य नागरिकांमध्ये झोपले

या फोटोमध्ये निलेश लंके कोणताही बडेजाव न मिवरता गरीब आणि सामान्य लोकांमध्ये झोपल्याचे दिसत आहेत. अंगवार काहीही नसताना ते शांतपणे झोप घेताना दिसतायत. त्यांच्या आजूबाजूला नागरिक आराम करत आहेत. लंके यांच्या आजूबाजूला झोपलेले कोरोनाग्रस्त आहेत की नेमके कोण हे सांगणे कठीण असले तरी ते कोविड सेंटरच्या परिसरात झोपलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांचा हाच फोटो सध्या चर्चेचा विषय बणला आहे.

पाहा फोटो :

हा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस अपडेट या फेसबुक पेजवरुन घेण्यात आला आहे. यामध्ये निलेश लंके झोपलेले दिसत आहेत.

शऱद पवारांच्या नावाने दोन ठिकाणी कोविड सेंटर

आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने अहमदनगरमध्ये दोन ठिकाणी 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केलेले आहे. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कारणांमुळेसुद्धा लंके काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती.

इतर बातम्या :

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोशल सिक्युरिटी कोडचा फायदा घेण्यास आधार आवश्यक, जाणून घ्या…

VIDEO : सदावर्तेंना मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायर्स म्हणायचं होतं की व्हायरस? बघा त्यांची संपूर्ण मुलाखत

महाराष्ट्रानंतर दिल्लीतही Oxygen on Wheels सेवा सुरु, Mahindra चा स्तुत्य उपक्रम

(photo of NCP MLA Nilesh Lanke sleeping with Corona patient in covid center goes viral on social media)