AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महावतार नरसिम्हा’मुळे पाकिस्तानातील प्रल्हादपुरी मंदिराची चर्चा; इथूनच झाली होलिका दहनाची सुरुवात

'महावतार नरसिम्हा' या चित्रपटामुळे पाकिस्तानातील एक मंदिर चर्चेत आलं आहे. या चित्रपटाच्या शेवटी या मंदिराचा फोटो दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानातील मुल्तान शहरात हे मंदिर आहे. इथूनच होलिका दहनाची सुरुवात झाली.

'महावतार नरसिम्हा'मुळे पाकिस्तानातील प्रल्हादपुरी मंदिराची चर्चा; इथूनच झाली होलिका दहनाची सुरुवात
पाकिस्तानातील प्रल्हादपुरी मंदिरImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2025 | 12:39 PM
Share

होळी हा भारतातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक आहे. हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. भारतासोबतच हा सण इतरही काही देशांमध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो, जिथे भारतीय राहतात. परंतु तुम्हाला पाकिस्तानमधील अशी एक जागा माहीत आहे का, ज्याचं होळीशी खूप मोठं कनेक्शन आहे. पाकिस्तानमधील या ठिकाणी एकेकाळी तब्बल नऊ दिवस होळी साजरी केली जायची. आता ‘महावतार नरसिम्हा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे ही जागा पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या अखेरीस पाकिस्तानच्या मुल्तानमधील प्रल्हादपुरी मंदिराचा फोटो दाखवण्यात आला आहे. तेव्हापासून या मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.

पाकिस्तानशी कसं कनेक्शन?

भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपु आणि होलिका यांच्यातील घटना पाकिस्तानात घडली होती. ज्याठिकाणी होलिका दहन झालं, त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं आहे. हजारो वर्षांपूर्वी ज्याठिकाणी हे मंदिर बांधलं गेलं होतं, ती जागा आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुल्तान शहरात आहे. या मंदिराचं नाव प्रल्हादपुरी मंदिर असं आहे. याच ठिकाणी भक्त प्रल्हादची आत्या होलिका आगीत भस्म झाली होती. लोककथेनुसार ही तीच जागा असल्याने तिथे सर्वांत आधी होलिका दहन साजरी करण्यात आली.

हजारो वर्षे जुन्या या प्रल्हादपुरी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 1861 मध्ये लोकांनी देणग्या गोळा केल्या होत्या. नंतर 1947 मध्ये भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी प्रल्हादपुरी मंदिर पाकिस्तानात गेलं. त्यानंतरही होळीच्या दिवशी तिथे भाविकांची मोठी गर्दी जमायची. तिथे दोन दिवस होलिका दहन केलं जात असे. त्यानंतर नऊ दिवस होळी मेळा आणि रंगोत्सव साजरा केला जात असे.

1992 मध्ये जेव्हा अयोध्येत बाबरी मशीदीचा भाग पाडण्यात आला तेव्हा मुल्तानमधील काही मुस्लीम कट्टरपंथीयांनी प्रल्हादपुरी मंदिर पाडलं होतं. त्यानंतर पंजाब सरकारनेही त्याकडे विशेष लक्ष घेतलं नाही. परंतु काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या न्यायालयाने या मंदिराच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. तरीही आतापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या हे मंदिर जीर्ण अवस्थेतच आहे.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण