
लग्नाचे अनेक डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होतात. जेव्हा पंजाबी लग्नाचा विषय येतो तेव्हा मात्र काहीतरी वेगळाच विषय असतो. या व्हिडीओ मध्ये नुकताच एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही शीख वृद्ध डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून असे वाटते की, वय म्हणजे वय म्हणजे काय असतं? फक्त नंबर तर असतो.
खरंतर हा व्हिडिओ एका युजरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की एकीकडे लग्नाचा कार्यक्रम सुरू असेल तर दुसरीकडे हा डान्सचा कार्यक्रम सुरू आहे, ज्यामध्ये हे सर्वजण डान्स करताना दिसत आहेत. मोजकीच पंजाबी गाणी वाजत आहेत आणि हे वृद्ध एकदम बिनधास्त होऊन डान्स करतायत.
तसंही पंजाबी गाण्यांमध्ये एक वेगळंच वातावरण असतं आणि सगळी पंजाबी गाणीही त्यांना नाचायला भाग पाडतात, ज्यांना नृत्य कसं करायचं त्यांना माहित असतं कोणत्या गाण्यावर कसं नाचायचं. या व्हिडीओमध्ये दोन वयस्कर शीख वडिलधाऱ्यांनी ‘यार बोल्डा’वर शानदार डान्स केलाय, हा डान्स एकदम गाण्याला अनुसरून आहे.
सध्या हा व्हिडिओ पिंक पँथर स्टुडिओ नावाच्या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला.
लग्नात दाखल झालेल्या पाहुण्यांनीही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली. सध्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत.