बघा बघा काय केलं राहुल गांधींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बघून…VIDEO

रचना भोंडवे, Tv9 मराठी

Updated on: Dec 06, 2022 | 5:13 PM

या प्रवासादरम्यान असं काही घडलं की तुम्ही हे बघून हसल्याशिवाय राहणार नाही.

बघा बघा काय केलं राहुल गांधींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बघून...VIDEO
rahul gandhi bharat at jodo yatra
Image Credit source: Social Media

राजस्थानमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. यात्रा आलेले हे पहिलेच काँग्रेस शासित राज्य आहे. झालावाडच्या खेल संकुल इथून सकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या या यात्रेने सकाळी साडेनऊपर्यंत सुमारे 11 किमीचा प्रवास पूर्ण केला. या दरम्यान यात्रेचे नेते राहुल गांधी हे लोकांना भेटताना दिसले. पण या प्रवासादरम्यान असं काही घडलं की तुम्ही हे बघून हसल्याशिवाय राहणार नाही.

खरंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात राहुल गांधी भाजप कार्यालयासमोरून जाताना दिसत आहेत.

या दरम्यान राहुल गांधी यांचा दौरा पाहण्यासाठी सकाळपासूनच भाजपच्या कार्यालयात अनेकांनी गर्दी केली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधींची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा राहुल गांधींनी फ्लाइंग किस करून त्यांना बाय बाय केलं.

हा व्हिडिओ ट्विटरवर @hoorsheikh_fiza नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

व्हिडिओला शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत आणि लोक त्यावर कमेंट करत आहेत आणि आपला फीडबॅक देत आहेत.

एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “हा एकमेव नेता आहेज्याने संसद लाईव्हमध्ये जाऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिठी मारली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI