
जगात अशा अनेक गोष्टी चित्रविचित्र आहेत. तिथल्या परंपरा, रितीरिवाज अचंबित करणारे आहेत. विचारात पाडणारे आहेत. ज्या गोष्टीसाठी एका समुदायात सजा सुनावली जाते, तीच गोष्ट दुसऱ्या समाजात परंपरेचा भाग असू शकते. हे ऐकल्यावर तर डोकं भणभणून जातं.ह्या परंपरांच्या मागे काही स्पष्ट कारणं नसली तरी, जेव्हा आपण ह्या परंपरांविषयी जाणतो, तेव्हा ती आपल्याला आश्चर्यचकित करतं. आता आपण ज्या परंपरेविषयी बोलणार आहोत, ती एक अशीच विचित्र परंपरा आहे. खरंतर, या परंपरेविषयी जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच विचार कराल, “खरंच असे लोक असतात का?”
हे सर्व सांगण्याचं कारण आहे राजस्थानमधील बाड़मेर जिल्ह्यातल्या एक गाव. या गावाचं नाव आहे दैरासर. या गावाची लोकसंख्या सुमारे 600 च्या आसपास आहे. पण या गावातल्या मुस्लिम कुटुंबांनी एक विशेष परंपरा पाळली आहे. ती परंपरा म्हणजे, त्या गावातील प्रत्येक पुरूषाला दुसरं लग्न करणं अनिवार्य आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. या कुटुंबांमध्ये प्रत्येक पुरूषाला दुसरं लग्न करणे आवश्यक आहे. पहिली पत्नी आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्य हे दुसरं लग्न पूर्णपणे समर्थन करतात आणि त्या विवाहासाठी जवळून मदत करतात.
या परंपरेचे एक कारण आहे. पहिल्या बायकोला मुळबाळ होत नाही. म्हणूनच दुसरं लग्न केलं जातं आणि त्यातून संतान प्राप्त होते. त्यानंतर पहिल्या पत्नीला देखील संतान होण्याची शक्यता निर्माण होते, असा इथल्या लोकांचा विश्वास आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, जर एकच पत्नी असेल, तर कितीही काळ गेला तरी संतान होत नाही. पण दुसरं लग्न केलं की संतानप्राप्ती लगेच होते. आणि हे त्यांच्या अनुभवावरून सत्य ठरले आहे. अर्थात, ही परंपरा काहीशी विचित्र आणि अनोखी आहे, नाही का?