परीक्षेला येताना फक्त टीशर्ट आणि कुर्ता-कुर्तीलाच परवानगी, नाहीतर संपत्ती जप्त! कुणी काढला फतवा?

परीक्षार्थींना फक्त टी-शर्ट, कुर्ता आणि कुर्ती परिधान करुनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षेवेळी ओढणीही घेता येणार नाही असंही सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच परीक्षार्थी फक्त एक पदरी असणारेच चप्पल आणि सँडल घालून येऊ शकणार आहेत.

परीक्षेला येताना फक्त टीशर्ट आणि कुर्ता-कुर्तीलाच परवानगी, नाहीतर संपत्ती जप्त! कुणी काढला फतवा?
| Updated on: Jul 23, 2022 | 12:07 PM

मुंबईः कधी कधी परीक्षा म्हटलं की, अभ्यासापेक्षा पास होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भानगडीतच काहींची बुद्धी चालते. त्याचमुळं मग शासनही एकापेक्षा एक कडक नियम करते.अशाच एक प्रकारच नियम राजस्थानमध्ये (Rajasthan) करण्यात आला आहे, त्यामुळे राजस्थानमधील परीक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. REET म्हणजे राजस्थानमधील शिक्षक पात्रता परीक्षा (Rajasthan Eligibility Examination for Teachers) 23-24 जुलै रोजी REET 2022 ही परीक्षा होत आहे. परीक्षा होण्यापूर्वी मात्र राजस्थान सरकारने एक सूचना जाहीर केली आहे, त्यामध्ये परीक्षेला येताना परीक्षार्थीनी काय परिधान करावे त्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

परीक्षेला येताना फक्त…

ज्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये राजस्थान सरकारने सांगितले आहे की, परीक्षेला येताना फक्त टी-शर्ट आणि कुर्ता आणि कुर्ती परिधान करणाऱ्यानाच फक्त परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयाबाबत राजस्थान सरकार म्हणते की, परीक्षा निष्पक्षणे पार पडावी त्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा

राजस्थानमध्ये REET2022 ही परीक्षा 23-24 जुलै रोजी होत आहे, त्या परीक्षेसाठी 15 लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार एका अधिाकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत, आणि परीक्षेआधी एक तास अगोदरच परीक्षा केंद्रात हजर राहावे लागणार आहे. त्याच अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाईल, ब्लूटूथ, कॅलक्युलेटर, घड्याळ असे साहित्य परीक्षा चालू असताना बरोबर ठेवता येणार नाहीत.

परीक्षार्थींना फक्त टी-शर्ट

परीक्षार्थींना फक्त टी-शर्ट, कुर्ता आणि कुर्ती परिधान करुनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षेवेळी ओढणीही घेता येणार नाही असंही सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच परीक्षार्थी फक्त एक पदरी असणारेच चप्पल आणि सँडल घालून येऊ शकणार आहेत. जो परीक्षार्थी हा डावलून परीक्षा केंद्रात येईल त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामध्ये जर परीक्षार्थी दोषी आढळून आला तर त्याला 10 ते 12 वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो असं सांगून त्याबरोबरच त्याची संपत्तीही जप्त केली जाऊ शकते असंही सांगण्यात आले आहे.

पेपर फुटीमुळे REET 2021 रद्द

मागील वर्षी REET परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती, त्यावेळी परीक्षेला सुमारे 16.5 लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यात आली होती, परीक्षा सकाळी 10 वाजता सुरू होणार होती, मात्र काही जणांकडे सकाळी साडेआठ वाजताच पेपरला पोहोचले होते. सवाई माधोपूरच्या गंगापूर शहरात अशा चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यांना परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला होता. तर बिकानेरमध्ये कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांशी दीड कोटींचा सौदा केला होता. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करुन त्याप्रकारचे ते चप्पल 7.50 लाख रुपयांना विकले गेले होते. असाच एक उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचला होता मात्र त्याला परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले. बिकानेर येथून तीन परीक्षार्थींसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.

बड्या अधिकाऱ्यांचाही हात

ज्यावेळी आरआयआयटी परीक्षेतील कॉपीप्रकारचा तपास बारकाव्याने करण्यात आला तेव्हा राजस्थानमधील शिक्षण खात्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा त्यात सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यानंतर कारवाई केली गेली त्यावेळी 100 पेक्षा अधिक जण या कारवाईत सापडले होते. त्यानंतर 2021 मधील आरईईटीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.