पैसे भरून मिळवा भाड्याची बायको, या देशात अजब ट्रेंड ! फिरायला भरभरून येतात भारतीय

आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि रात्रीच्या जीवनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशामध्ये रेंटल वाइफ अर्थात भाड्याने पत्नी मिळण्याती प्रथा सामान्य आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी, काही शहरांमध्ये ही प्रथा खूप काळापासून प्रचलित आहे.

पैसे भरून मिळवा भाड्याची बायको, या देशात अजब ट्रेंड ! फिरायला भरभरून येतात भारतीय
Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 15, 2026 | 3:05 PM

जगभरात असलेले असंख्य देश हे त्यांच्या विविध परंपरा, नाइटलाइफ, पर्यटन स्थळे आणि इतर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात. बरचे जण पर्यटनासाठी एका देशातून दुसऱ्या देशात जातात. पण या भल्यामोठ्या पृथ्वीर, एक देश असाही आहे, ज्या ठिकाणी एक अनोखी परंपरा आहे. खरं तर, जगातील एका शहराने रेंटल वाइफ अर्थात भाड्याने बायका देण्याची परंपरा विकसित केली आहे. चला तर मग, जगात असा कोणता देश आहे जिथे भाड्याने बायका मिळतात आणि तिथे भारतातील बहुतेक लोक फिरायला जातात, ते जाणून घेऊया.

कोणत्या देशात भाड्याने मिळते पत्नी ?

आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंड या देशामध्ये रेंटल वाइफ, म्हणजेच भाडं देऊन पत्नी मिळते. हे ऐकायला किंवा वाचायला कितीही विचित्र वाटत असलं तरी, या देशातील काही शहरांमध्ये ही प्रथा खूप काळापासून चालत आलेली आहे आणि आता याचं एका व्यवसायात रूपांतर झालं आहे. थायलंडमध्ये, विशेषतः पट्टायासारख्या पर्यटन स्थळांमध्ये, महिला मर्यादित कालावधीसाठी पर्यटकांसोबत पत्नी म्हणून राहतात.

हा काही पारंपरिक किंवा कायदेशीर विवाह नसतो, तर तो एक वैयक्तिक करार आहे. यामध्ये स्त्री जोडीदार एका ठराविक कालावधीसाठी पत्नी म्हणून जबाबदाऱ्या स्वीकारते, उदा की जोडीदाराला भेटणं, त्याची काळजी घेणं किंवा त्याच्यासोबत वेळ घालवणं. आणि याचा कालावधी देखील असा काही मर्यादित नाही. काही तासांपासून ते अनेक दिवस किंवा महिन्यांपर्यंत हे होऊ शकतं. या काळात, दोन्ही पक्ष परस्पर संमतीने नात्याच्या अटी ठरवतात.

रेंटल वाइफसचा ट्रेंड कसा झाला मोठा व्यवसाय ?

खरंतर थायलंडमधील पर्यटनाच्या वाढत्या व्याप्तीमुळे हा ट्रेंडही वेगाने पसरत आहे. मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक थायलंडमध्ये येतात, त्यापैकी बरेच जण एकटेच प्रवास करतात. सोबतीच्या या मागणीमुळे या पद्धतीचा विकास झाला आहे. एका अहवालानुसार,ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत, त्यांच्यासाठी हा ट्रेंड म्हणजे उत्पन्नाचा एक स्रोत बनला आहे.

किती असते रेंटल वाइफची किंमत ?

या व्यवस्थेमध्ये ठरवलेली रक्कम स्त्रीचे वय, सौंदर्य आणि शिक्षण यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. वेगवेगळ्या केसेसमध्ये, ही रक्कम अंदाजे 1,600 ते 116,000 डॉलर्स पर्यंत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ही संपूर्ण प्रणाली कोणत्याही अधिकृत कायद्याच्या अधीन नाही, तर ती खाजगी करारांच्या आधारावर चालते.

पुस्तकातून झाला रेंटल वाइफचा खुलासा

Thai Taboo: The Rise of Wife Rental in Modern Society या पुस्तकात पत्नी भाड्याने देण्याच्या प्रथेबद्दल अलीकडेच सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही प्रथा कशी झपाट्याने वाढत आहे आणि आता ती सामाजिक, आर्थिक आणि पर्यटन संस्कृतीचा एक भाग बनली आहे, ते लेखकान स्पष्ट केलंय. मात्र अनेक प्रकरणांमध्ये, हे तात्पुरते संबंध नंतर कायमस्वरूपी संबंधांमध्ये विकसित होतात, ज्यामुळे ही प्रथा अधिक चर्चेचा विषय बनल्याचंही त्यांत नमूद करण्यात आलं होतं.

Follow Us