AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! 16 मुस्लिम देश एकत्र, थेट घेतला मोठा निर्णय, इस्त्रायल…

इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. तब्बल 16 देशांनी इस्त्रायलविरोधात भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे. हा मोठा धक्का मानला जात आहे.

जगात हाहाकार! 16 मुस्लिम देश एकत्र, थेट घेतला मोठा निर्णय, इस्त्रायल...
Benjamin Netanyahu
| Updated on: Apr 19, 2026 | 1:48 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात मोठा दणका इस्त्रायलला बसला. इस्त्रायलच्या विरोधात अनेक देशांनी थेट विरोधात भूमिका घेतली. तब्बल 16 देश इराणच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 18 एप्रिल 2026 रोजी दोहा येथे एक संयुक्त निवेदन जारी केले. सोमालियामध्ये इस्रायलने राजनैतिक प्रतिनिधीच्या नियुक्तीचा निषेध केला. इस्त्रायलच्या हा निर्णय सोमालियाच्या संघराज्याच्या सार्वभौमत्व, एकता आणि प्रादेशिक अखंडतेचे थेट उल्लंघन आहे, असेही म्हटले. हे पाऊल धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले. इस्त्रायलच्या विरोधात सऊदी अरब, कुवेत, कतार, मित्र्स, लीबिया, सूडान, बांग्लादेश, लिफिस्तान, अल्जीरिया, तुर्की, पाकिस्तान, मॉरिटानिया, जॉर्डन, ओमान, मॉरिटाानिया या देशांनी इस्त्रायलविरोधात भूमिका घेतली.

संयुक्त निवेदनात यावर जोर देण्यात आला की, इस्रायलचा निर्णय आफ्रिकन युनियनच्या घटनात्मक कायद्याचे उल्लंघन करतो. या देशांनी इशारा देत म्हटले की, इस्त्रायलच्या निर्णयाने क्षेत्रात अस्थिरता निर्माण होऊ शकते. शांतता आणि सुरक्षेवर चुकीचा परिणाम पडू शकतो, 16 देशांनी सोमालियाच्या एकतेला आपला खंबीर पाठिंबा असल्याचेही म्हटले. सोमालियाबाबत इस्रायलच्या निर्णयामुळे रोष वाढला आहे.

सोमालियामध्ये इस्त्रायल राजदूतची नियुक्ती अवैध मानली जात आहे. मुस्लिम देशांनी एक एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचे म्हटले. सोमालीलँडमधील इस्त्रायलचा हस्तक्षेप स्वीकार केला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. परराष्ट्र मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सोमालियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. इस्त्रायलने सोमालियाच्या शांततेला धक्का लागवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला.

16 देशांनी पुढे येत सोमालियाची शांतता अखंड राहावी, असेही म्हटले. सोमालियाची अखंडता जपण्यासाठी आम्ही सर्वतोपरी राजनैतिक प्रयत्न करत राहू आणि अशा कोणत्याही दूताला मान्यता देणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मात्र, इराणसोबतच्या युद्धात हा मोठा नवीन धक्का इस्त्रायलला बसल्याचे बघायला मिळत आहे. इस्त्रायलविरोधात देशांनी थेटपणे भूमिका घेतली आहे. दुसरीकडे इस्त्रायलच्या नादी लागून इराणवर अमेरिकेने हल्ला केल्याचाही आरोप केला जात आहे. इस्त्रायल यावर काय भूमिका घेतो हे पाहण्यासारखे ठरते. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग वैतागले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...