एलियन्सकडून मानवांना मिस्ड कॉल?; काय सुरू आहे चर्चा?

संशोधकांना पृथ्वीसारख्या खडकाळ एक्सोप्लॅनेटमधून रेडिओ सिग्नल मिळाले आहेत. तेथे जीवसृष्टी असणे अपेक्षित आहे, कारण येथे संशोधकांनी चुंबकीय क्षेत्र (Magnetic field) असण्याबाबतही सांगितले आहे, ज्यामुळे तेथे जीवनाची शक्यता असू शकते. सिग्नल पाठवणारे एलियन असू शकतात का?? चला जाणून घेऊया.

एलियन्सकडून मानवांना मिस्ड कॉल?; काय सुरू आहे चर्चा?
Image Credit source: social media
| Updated on: Apr 10, 2023 | 2:08 PM

खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीच्या आकाराच्या खडकाळ एक्सोप्लॅनेटमधून रेडिओ सिग्नल सापडला आहे. हे सिग्नल (signal) सातत्याने येत आहेत. खगोलशास्त्रज्ञांनी तेथे जीवन असण्याची आशा व्यक्त केली आहे, कारण या ठिकाणी राहण्यायोग्य बनवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field),आहे. ज्याचा संशोधक दावा करत आहेत.

या ग्रहाचे नाव YZ Ceti b आहे आणि तो पृथ्वीपासून सुमारे 12 प्रकाशवर्षे दूर एका लहान लाल बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. यूएस नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरीचे प्रोग्राम डायरेक्टर जो पेस (Joe Pesce) यांच्या सांगण्यानुसार, खडकाळ आणि पृथ्वीसारख्या एक्सोप्लॅनेटमध्ये चुंबकीय क्षेत्रे आहेत की नाही यावर दुसऱ्या सौरमालेतील संभाव्य ग्रहाचा शोध हे अवलंबून आहे. ते म्हणाले की या संशोधनातून असे दिसून आले आहे की या खडकाळ एक्सोप्लॅनेटमध्ये केवळ चुंबकीय क्षेत्र असण्याचीच शक्यता नाही, तर आणखी बरेच काही शोधले जाऊ शकते.

मॅग्नेटिक फील्ज किंवा चुंबकीय क्षेत्र, हे असे क्षेत्र आहे जे शक्तिशाली स्टेलर वाऱ्यांमुळे ग्रहाचे वातावरण खराब होऊ देत नाही. उदाहरणार्थ, मंगळावर वातावरण असायचे. तो एक उष्ण आणि ओला ग्रह होता. परंतु त्याचे चुंबकीय क्षेत्र गमावल्यानंतर त्याचे वातावरण हळूहळू नष्ट झाले. आपल्या सौरमालेतील गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यूनमध्ये अजूनही चुंबकीय क्षेत्र आहेत. आणि याआधी देखील खगोलशास्त्रज्ञांना अशा एक्सोप्लॅनेटचे पुरावे सापडले आहेत ज्यांचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र होते.

परंतु आपल्या सूर्यमालेबाहेरील लहान, खडकाळ ग्रहांवर याआधी आपल्याला चुंबकीय क्षेत्र आढळले नाही. पण या एक्सोप्लॅनेटमधून रेडिओ सिग्नल्स सतत येत असतात. टीमच्या मतानुसार, या सिग्नलचा अर्थ असा होतो की ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र YZ Ceti या ताऱ्याशी संवाद साधत आहे, त्याची परिक्रमा हा ग्रह करत असतो.

पण जास्त उत्तेजित होऊन फायदा नाही, कारण YZ Ceti b चे चुंबकीय क्षेत्र असले तरी तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता नाही. खरं तर, एक्सोप्लॅनेट YZ Ceti च्या इतका जवळ आहे की त्याची कक्षा फक्त दोन दिवस आहे. सोप्या शब्दांक सांगायचं झालं तर ही गोष्ट समजून घ्या की, आपल्या सूर्याच्या सर्वात जवळ असलेला बुध ग्रह सूर्याभोवती एकदा प्रदक्षिणा घालण्यासाठी 88 दिवस घेतो.

हा सिग्नल न्यू मेक्सिकोमध्ये कार्ल जी यांना मिळाला होतात. पेनसिल्व्हेनियामधील बकनेल युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ जॅकी विलाडसेन यांनी (Jackie Villadsen) डेटा पाहून ओळखला. विलाडसन सांगतात की, त्यांनी सुरुवातीचा स्फोट पाहिला आणि तो सुंदर दिसत होता. त्याकडे पुन्हा पाहिले असतै, त्याच्याकडून संकेत मिळत असल्याचे जाणवले.

एलियन सिग्नल पाठवत आहेत का ?

हे सिग्नल किंवा संकेत का मिळत आहेत, याविषयी बोलताना विलाडसेन यांनी सांगितले की, तेथे शक्तीशाली रेडिओ लहरी (radia waves) उत्पन्न होत आहेत, कारण ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र त्याच्या ताऱ्यातून बाहेर पडणाऱ्या प्लाझ्माला ओलांडते. या कारणास्तव YZ Ceti b ची कक्षा लहान असूनही चुंबकीय क्षेत्र आहे. तो आपल्या ताऱ्याशी इतका संवाद साधतो की त्याच्या रेडिओ लहरी पृथ्वीवरूनही पकडल्या गेल्या आहेत.

रेडिओ लहरींच्या सामर्थ्यावर आधारित, संशोधक चुंबकीय क्षेत्र दर्शवू शकले, परंतु त्यांचे म्हणणे आहे की जर याची पुष्टी झाली तर, सिग्नल पाहणारा हा पहिला खडकाळ, पृथ्वीच्या आकाराचा एक्सोप्लॅनेट असेल.