एका हत्तीला वाचविण्यासाठी इतका खटाटोप! बघा व्हिडीओ, माणुसकीवर विश्वास बसेल

व्हायरल क्लिपमध्ये विहिरीत पडलेला हत्ती आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

एका हत्तीला वाचविण्यासाठी इतका खटाटोप! बघा व्हिडीओ, माणुसकीवर विश्वास बसेल
elephant video rescue operation
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 15, 2022 | 5:40 PM

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात हत्तींचे कळप अनेकदा अन्नाच्या शोधात जंगलातून खेड्यापाड्यात शिरतात. मंगळवारी सकाळी एक हत्ती आपल्या कळपातून भरकटला आणि गावाजवळील शेतातील खोल विहिरीत पडला. माहितीनुसार, हत्तीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी मागवला. त्यानंतर विहीर खोदून हत्तीला बाहेर काढण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशनचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, जो व्हायरल झाला आहे.

बंगारूपालेम मंडल परिसरातील गंडलापल्ली गावाजवळील शेतात ही घटना घडली. व्हायरल क्लिपमध्ये विहिरीत पडलेला हत्ती आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

त्याचबरोबर घटनास्थळी उपस्थित वनविभागाचे पथक आणि ग्रामस्थ त्याला वाचवण्यासाठी खूप धडपड करत आहेत.

एवढे प्रयत्न करूनही हत्तीला विहिरीतून बाहेर पडता येत नाही, त्यामुळे वनविभागाचे अधिकारी जेसीबी मशीन मागवतात. यानंतर विहिरीच्या कडा तोडून हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.

हत्तीला हटवणं खूप कठीण होतं, असं गावकऱ्यांनी सांगितलं. जेसीबी मशीन बोलवावे लागले. मग विहिरीच्या कडा तोडून खड्डा करण्यात आला, जेणेकरून हत्तीला आरामात बाहेर काढता येईल. आता या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.