‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी या ठिकाणी गर्लफ्रेंडला चुकूनही घेऊन जाऊ नका, निसर्ग पाहून….

'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी या ठिकाणी गेलात तर गर्लफ्रेंड देखील होईल खूश. भारतातील अतिशय सुंदर ठिकाण. जे पाहून गर्लफ्रेंडही करेल तुमचं कौतुक. आताच बघून घ्या.

| Updated on: Jan 26, 2026 | 5:18 PM
1 / 5
व्हॅलेंटाइन डे जवळ आला की अनेक कपल्स रोमँटिक ठिकाणी जाण्यासाठी प्लॅन करत असतात. जिथे शांत आणि निसर्गरम्य वातावरण असेल. भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जी आजही प्रचंड पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहेत.

2 / 5
त्यापैकीच एक लपलेले रत्न म्हणजे पश्चिम बंगालमधील रिमबिक हिल स्टेशन. हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात वसलेले एक छोटे पण अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे. मोठ्या पर्यटनस्थळांपासून दूर असल्यामुळे येथे शांतता आणि निसर्गाचा खरा आनंद घेता येतो.

3 / 5
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या पार्टनरसह काही खास आणि अविस्मरणीय क्षण घालवायचे असतील तर रिमबिक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. येथे पसरलेली घनदाट हिरवळ, सुंदर दऱ्या-खोऱ्या आणि ढगांआडून डोकावणारा सूर्य. हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

4 / 5
रिमबिकहून दिसणारा कंचनजंगा पर्वताचा अद्भुत नजारा पाहून कोणालाही भुरळ पडते. यासोबतच, दूरवर पसरलेले हिरवेगार टी गार्डन्स या ठिकाणाला जणू एखाद्या सुंदर पेंटिंगसारखे रूप देतात. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी रिमबिक हे एक स्वर्गच आहे.

5 / 5
व्हॅलेंटाइन डेच्या गडबडीतून दूर जाऊन, शांततेत एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी रिमबिकसारखे ठिकाण अत्यंत योग्य आहे. येथे फारशी गजबज नसल्यामुळे कपल्सना खासगीपणा आणि निवांतपणा मिळतो.