AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाह रे पठ्ठया! अशी कुणी चोरी केली होती? खेळणीतल्या बंदुकीने?

नाला सोपारा इथे काही दिवसांपूर्वी एका कॅब चालकाने हे कृत्य केलंय.

वाह रे पठ्ठया! अशी कुणी चोरी केली होती? खेळणीतल्या बंदुकीने?
Viral newsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Dec 08, 2022 | 4:44 PM
Share

चोरीच्या अनेक विचित्र घटना घडतात. अनेक वेळा चोरटेही त्यांच्या मजेशीर कृतीमुळे प्रसिद्ध होतात, तरी कधी कधी ते पकडलेही जातात. खेळण्यातील बनावट बंदुक घेऊन चोरटा चोरी करण्यासाठी आला असताना असाच प्रकार उघडकीस आला आहे. आश्चर्य म्हणजे त्याने सुमारे दहा लाखांचे दागिनेही लुटले, पण अखेर तो पकडला गेला.

खरंतर ही घटना मुंबईतील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नाला सोपारा इथे काही दिवसांपूर्वी एका कॅब चालकाने हे कृत्य केलंय.

या घटनेपूर्वी त्याने एक योजना तयार केली. काही दिवसांपूर्वी या दुकानाजवळ एका प्रवाशाला सोडण्यासाठी तो गेला होता, त्यानंतर त्याच वेळी त्याने इथे लुटण्याचा प्लॅन केला. रस्त्यात त्याला खेळण्याचे दुकान दिसले तिथे त्याने ही बंदूक घेतली.

रिपोर्ट्सनुसार कमलेश असं त्याचं नाव असून त्याने 26 नोव्हेंबर रोजी ही घटना केली आहे, जी आता समोर आली आहे.

तो खेळण्यातील बंदूक खरेदी करण्यासाठी गेला आणि त्यानंतर दागिन्यांच्या दुकानात गेला. तिथे त्यांनी स्वत:ची ओळख ग्राहक अशी करून दिली आणि त्यानंतर दुकानाचे मालक सुरेश कुमार यांना चांदीचे काही दागिने दाखवण्यास सांगितले.

दरम्यान, आपल्या पत्नीला सोन्याचे कानातले विकत घ्यायचे आहेत आणि मी पुन्हा येईन, असेही त्याने सांगितले. त्यानंतर तो निघून गेला आणि बॅग घेऊन परत आला.

त्याने दागिने बॅगेत भरले आणि त्याच बनावट बंदुकीच्या जोरावर त्याने लूट केली. दुकानदाराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो पळून गेला असे सांगण्यात आले.

कॅब चालक चोरट्याने अशी चूक केली की चोरीदरम्यान तो दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यासाठी त्याच्याकडे कोणतीही योजना तयार नव्हती.

त्याआधारे पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी सांगितले की ड्रायव्हरवर यापूर्वी इतर पोलिस ठाण्यांमधील दागिन्यांच्या दुकानातून दरोड्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

Follow Us
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...