5 रुपयांना मिळणाऱ्या Parle-G ची किंमत या शहरात 2348 रुपये, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

viral news: भारतात पाच रुपयांना मिळणार पारले जी पॅलेस्टाईनमध्ये 2348 रुपयांना मिळत आहे. गाझामधील परिस्थितीमुळे खाण्याच्या वस्तूंच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

5 रुपयांना मिळणाऱ्या Parle-G ची किंमत या शहरात 2348 रुपये, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
| Updated on: Jun 07, 2025 | 1:16 PM

भारतातील सर्वात लोकप्रिय बिस्किटावर जेव्हा चर्चा होते, तेव्हा Parle-G चे नाव सर्वात पुढे येते. अनेक वर्षांपासून पारले जी बिस्किटाने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. पारले जी बिस्किटाची चव लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना भावते. भारतात पाच रुपयांमध्ये मिळणारे हे बिस्कीट एखाद्या शहरात 2348 रुपयांना मिळत आहे, असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे.

काय आहे पोस्ट

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत असतात. त्यातील काही पोस्ट युजरला भारावून टाकतात. पॅलेस्टाईनमधील गाझा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युद्ध आणि विध्वंस याने घेरलेल्या गाझामध्ये एका, एका वस्तूचे मूल्य किती आहे, त्याची माहिती या व्हिडिओमधून समोर येत आहे. भारतात पाच रुपयांना मिळणारे पॉरले जी बिस्कीट गाझामध्ये 24 यूरो (2,348 रुपये) मिळत आहे.

सोशल मीडियावरील या पोस्टमधील व्हिडिओत लहान मुलगा खूप आनंदाने पारले जी बिस्किट खाताना दिसत आहे. त्या मुलाचा आनंद पाहून नेटकरी भारावले आहे. मोहम्मद जावेद नावाच्या युजरने पोस्ट करताना लिहिले की, दीर्घ कालावधीनंतर रफिफला त्याचा आवडता पारले बिस्कीट मिळला आहे. त्याची किंमत आता 1.5 यूरोवरुन 24 यूरो झाली असली तरी मी रफिफला ते बिस्कीट देण्यास नकार देऊ शकत नाही.

गाझामध्ये पारले का महाग?

गाझामध्ये Parle-G बिस्किट महाग मिळण्याचे कारण त्या ठिकाणी इस्त्रायल आणि गाझा दरम्यान सुरु असलेल्या युद्धाची असलेली परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे खाण्याच्या वस्तूंच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. सोशल मीडियावर त्यावर युजर वेगवेगळ्या पद्धतीने कॉमेंट करत आहेत.

एका व्यक्तीने परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी टॅग करत लिहिले, तो लहान मुलगा देशातील सर्वात लोकप्रिय बिस्किट खात आहे. मला माहिती आहे की, युद्धात भारताची भूमिका तटस्थ आहे. परंतु आपण पॅलेस्टाईनला आणखी पारेल जी बिस्किट पाठवू शकतो का? आणखी एक युजर म्हणतो, पारले जी कोणाच्या डोळ्यात आनंद आणू शकतो तर शांतता किती आनंद आणेल? एका व्यक्तीने म्हटले, आमच्यासाठी Parle-G सामान्य वस्तू आहे. परंतु त्या मुलासाठी एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. आणखी एक जण म्हणतो, युद्धामुळे कोणाचे कल्याण होत नाही, हे सत्य आहे.