रशियन मुलीने हनुमान चालीसा म्हटली, लोकांनी हातच जोडले!

ती देशात आल्यापासून फक्त हिंदीच शिकली नाही, तर ती हार्मोनियम सुद्धा इथे शिकलीये.

रशियन मुलीने हनुमान चालीसा म्हटली, लोकांनी हातच जोडले!
Russian Girl recites hanuman chalisa
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 19, 2022 | 3:47 PM

इतर कोणत्याही देशाची भाषा बोलणं सोपं नसतं. आधी तर आपल्याला ती भाषा शिकावी लागते. नीट शिकून घेतली की मग आपल्याला ती छान बोलताही येते. जर आपल्याला रशियन बोलायचं असेल तर आधी शिकावं लागेल आणि मग तोडकं मोडकं बोलता येईल. पण रशियन असलेली एक लहान मुलगी अस्खलित हिंदी बोलते आणि बोलताना लगेच हिंदीत प्रतिसाद देते. इतकंच नाही तर मुलगी हनुमान चालिसाही वाचते. लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

व्हायरल झालेल्या एका नव्या व्हिडीओमध्ये 7 वर्षांची क्रिस्टीना हिंदी बोलताना दिसतीये, तिच्या या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

युट्युबर गौतम खट्टरने नुकतीच क्रिस्टीनाची मुलाखत घेतली, ज्याने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर ही मुलगी एकदम देसी उच्चारात बोलत होती.

क्रिस्टीनाने खुलासा केला की, ती देशात आल्यापासून फक्त हिंदीच शिकली नाही, तर ती हार्मोनियम सुद्धा इथे शिकलीये.

रशियन मुलीने खुलासा केला की भाषा आणि कलेचे ज्ञान असण्याव्यतिरिक्त, तिने धर्माबद्दल चांगले ज्ञान घेतले आणि मंत्र शिकून घेतले.

या छोट्याशा रशियन मुलीला भारतातच लहानाचं मोठं व्हायचंय. तिला भारतीय कुटूंबात लग्न करून भारतातच स्थायिक व्हायचंय अशी इच्छाही तिने व्यक्त केलीये.

पाहा व्हिडिओ-

गौतम खट्टर यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले की, 7 वर्षांची मुलगी क्रिस्टीना आपल्या मुलांना इंग्रजांची मुले बनवू इच्छिणाऱ्या भारतीय पालकांच्या चेहऱ्यावर एक थप्पड आहे. दुसरीकडे या परदेशी मुलीने आपला देश रशिया सोडून भारतीय गुरुकुलमध्ये शिक्षण घेतले.

जेव्हा ती आपल्या बॅगेतून एक वही बाहेर काढत होती, तेव्हा मुलाखत घेण्याऱ्याने क्रिस्टीनाला विचारले की ती वही कशाबद्दल आहे. मुलीने यावर उत्तर देताना सांगितलं की तिने तिचे मंत्र लिहिण्यासाठी या चिठ्ठीचा वापर केलाय.

इतकंच काय तर हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात करताना तिने हात जोडून, डोळे बंद करून म्हणायला सुरुवात केली.