4 मुलांची आई, घनदाट जंगलातील गुहेत एकटीच राहायची, मग डॉक्टरशिवाय मुलांना कसा दिला जन्म?; तिनेच सांगितलं रहस्य

कर्नाटकातील एका रहस्यमय गुहेत सापडलेल्या रशियन महिला नीना कुटीना यांनी स्वतः एक मोठे रहस्य उलगडले आहे. त्यांनी 15 वर्षांत 20 देश फिरताना मुलांना जन्म कसा दिला हे सांगितले आहे.

4 मुलांची आई, घनदाट जंगलातील गुहेत एकटीच राहायची, मग डॉक्टरशिवाय मुलांना कसा दिला जन्म?; तिनेच सांगितलं रहस्य
Nina kutti
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 19, 2025 | 2:49 PM

कर्नाटकातील गोकर्णच्या डोंगरांमधील एका रहस्यमयी गुहेत दोन मुलींसह सापडलेल्या रशियन महिला नीना कुटिना उर्फ मोही यांच्या अनेक रहस्यांवरून पडदा उठला आहे. नीना यांचा पती देखील समोर आला आहे. नीना यांचा पती ड्रोर गोल्डस्टीन, जो इस्रायली आहे, तो बेंगलुरूला पोहोचला आणि त्याने दोन्ही मुलींची कस्टडी मागितली आहे. दरम्यान, नीना कुटिना यांनी न्यूज एजेंसी पीटीआयशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी प्रथमच याबाबतही खुलासा केला की त्यांच्या दोन्ही मुलींचा जन्म कुठे झाला.

नीना यांनी कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप करत सांगितलं की त्यांचं मौल्यवान सामान अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे, अगदी त्यांच्या मुलाच्या अस्थीही जप्त केल्या आहेत. नीना यांनी संभाषणादरम्यान सांगितलं की त्यांना चार मुलं आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून त्या जगातील सुमारे 20 देशांचा प्रवास करत आहेत. त्यांच्या एका मुलाचा मृत्यू नऊ महिन्यांपूर्वी झाला होता.

वाचा: सुंदर होती मुलाची बायको, प्रेमात पडला सासरा… मुलाला कळताच जे झालं पोलिसही हादरले

नीना यांनी मुलाखतीत सांगितलं, “माझी सर्व मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जन्मली आहेत. मी कोणत्याही रुग्णालय किंवा डॉक्टरांच्या मदतीशिवाय एकट्याने त्यांना जन्म दिला, कारण मला प्रसूती कशी करायची याची माहिती आहे. कोणीही माझी मदत केली नाही. हे सर्व मी एकट्याने केलं.”

नीना यांनी प्रथमच त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी कला आणि रशियन साहित्याची शिक्षिका आहे. मी माझ्या मुलांना खाजगीरित्या शिक्षण दिलं आहे. जेव्हा लोक माझ्या मुलांना भेटतात, तेव्हा ते म्हणतात की ती खूप हुशार, निरोगी आणि प्रतिभावान आहेत. तरीही, मी माझ्या मुलींची अजून कोणत्याही शाळेत नोंदणी केलेली नाही.”

‘आमच्याकडे पुरेसे पैसे आहेत’

आपल्या कमाईबद्दल नीना म्हणाल्या, “मी चित्रकला, म्युझिक व्हिडीओ बनवते. कधीकधी शाळांमध्ये शिकवते. बेबी सिटिंगचं कामही करते. या सर्व गोष्टींमधून मला पैसे मिळतात. जेव्हा माझ्याकडे काम नसतं आणि पैशांची गरज असते, तेव्हा मी माझ्या भावाकडून, वडिलांकडून किंवा अगदी मुलाकडून पैसे घेते. अशा प्रकारे आमच्याकडे गरजांसाठी पुरेसे पैसे असतात.”

‘स्वेच्छेने गुहेत राहायला गेलो होतो’

कुटिना यांनी सांगितलं की त्यांचं कुटुंब स्वेच्छेने गुहेत राहायला गेलं होतं, पण आता जिथे मला ठेवण्यात आलं आहे, तिथे खूप असुविधा आहे. ही जागा खूप घाणेरडी आहे. येथे गोपनीयता नाही. आम्हाला फक्त साधा भात खायला दिला जात आहे. आमच्या अनेक वस्तू जप्त केल्या गेल्या आहेत, अगदी माझ्या मुलाच्या अस्थीही जप्त केल्या गेल्या. माझ्या मुलाचा मृत्यू नऊ महिन्यांपूर्वी झाला होता.”