
एक विचित्र प्रकार समोर आला आहे. दूध काढताना म्हैस एक महिलेच्या अंगावर पडली. या घटनेत महिला जखमी झाली, मात्र पाच मिनिटांच्या आत त्या म्हशीचा मृत्यू झाला आहे. ज्या म्हशीचा मृत्यू झाला ती म्हैस चारा खात होती, तर ज्या महिलेच्या अंगावर ही म्हैस पडली ती महिला तिचं दूध काढत होती. चारा खात असतानाच अचानक ही म्हैस महिलेच्या अंगावर पडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली मात्र म्हशीचा मृत्यू झाला आहे. पाचच मिनिटांमध्ये या म्हशीचा मृत्यू झाला.
ही घटना राजस्थानच्या करौली जिल्ह्यातल्या पैटोली गावामध्ये घडली आहे.पैटोली गावाचे रहिवासी असलेल्या मोहन सिंह यांच्या घरी हा विचित्र प्रकार घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी मशीचं दूध काढत होती. तर म्हैस चारा खात होती. याचदरम्यान ही भलीमोठी म्हैस त्यांच्या पत्नीच्या अंगावर पडली. या घटनेत त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. मात्र म्हशीचा मृत्यू झला.
या घटनेबाबत बोलताना मोहन सिंह यांनी सांगितलं की माझी पत्नी मशीची धार काढत होती. याचदरम्यान म्हैस अचानक तिच्या अंगावर पडली. मोठा आवाज झाला, आवाज कशाचा झाला म्हणून ते पाहाण्यासाठी आम्ही बाहेर आलो पाहातो तर म्हैस माझ्या पत्नीच्या अंगावर पडली होती. या घटनेत माझी पत्नी गंभीर जखमी झाली. मी माझ्या काही नातेवाईकांच्या मदतीनं त्या मशीला माझ्या पत्नीच्या अंगावरून दूर केलं मात्र त्यानंतर आम्हाला असं कळालं की त्या म्हशीचा मृत्यू झाला आहे.मात्र या म्हशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून समोर आलेलं नाहीये. दरम्यान ही घटना तीन वर्षापूर्वीची आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल होत आहे.
या घटनेत या म्हशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र महिला गंभीर जखमी झाली. तिच्या हाता-पायाला फॅक्चर होतं. उपचारानंतर या महिलेला डिस्चार्ज मिळाला.