VIDEO | मगरीच्या पाठीवर बसून स्टाईल मारत होता, असा शिकवला धडा, तुम्ही पण म्हणाल ‘खूप छान’

| Updated on: Mar 31, 2023 | 10:08 AM

लोकांना आपण किती धाडसी असल्याचं ती व्यक्ती दाखवत आहे. त्याचवेळेस मगरीच्या तोंडावर हातातली वस्तू मारल्यानंतर मगर तोंड उघडते. त्यानंतर दुसरी मगर त्याचवेळेस मागे फिरते

VIDEO | मगरीच्या पाठीवर बसून स्टाईल मारत होता, असा शिकवला धडा, तुम्ही पण म्हणाल खूप छान
Crocodile Video
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) काही व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Video Viral) झालेले असतात. त्याबरोबर ते लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. प्राण्यांचे अधिक व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत असतात. सध्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती तिथं असलेल्या मगरीच्या (Crocodile Video) अंगावर बसतो. त्यानंतर तो त्यांच्या हातात असलेल्या वस्तूने त्या मगरीच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यावेळी नेमकं काय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.

एखाद्या गोष्टीमध्ये साहस आणि मुर्खता अशा दोन गोष्टी असतात. धाडसी करणाऱ्या व्यक्तीकडे चतूरपणा आणि डोकं एकदम तरबेज असावं लागतं. तसेच लोकांना दाखवण्यासाठी ज्यावेळी धाडस केलं जातं, त्याला मुर्खता असं म्हटलं जातं. एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका प्राणी संग्रहालयात एक व्यक्ती मुद्दाम एका व्यक्तीला मी किती धाडसी असल्याचं दाखवतं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीसोबत नेमकं काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. तिथं दोन मगरी दिसत आहेत. त्यापैकी एका मगरीने पाठीवर बसल्यानंतर काय केलंय व्हिडीओ पाहा.

हे सुद्धा वाचा

लोकांना आपण किती धाडसी असल्याचं ती व्यक्ती दाखवत आहे. त्याचवेळेस मगरीच्या तोंडावर हातातली वस्तू मारल्यानंतर मगर तोंड उघडते. त्यानंतर दुसरी मगर त्याचवेळेस मागे फिरते. त्यानंतर घाबरलेली व्यक्ती मगरीच्या अंगावरुन उठते आणि त्या व्यक्तीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी ती व्यक्ती तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी त्याचं लक्ष संपूर्ण दुसऱ्या मगरीकडे आहे. महिली मगर बदला घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मगर ताबडतोब त्या माणसाच्या मांडीला चावते. इंटरेस्टिंग चॅनलने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.