आईच्या पिंडदानाची तयारी करत होता तितक्यात वाजला फोन अन्.. तरुणासोबत घडली चमत्कारिक गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

आयुष्यात कधी, कधी अशा गोष्टी घडतात त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. पण चमत्कार घडतो. अशीच एक घटना एका कुटुंबाबाबत घडली, ज्यावर त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीय. ही गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटू शकते.

आईच्या पिंडदानाची तयारी करत होता तितक्यात वाजला फोन अन्.. तरुणासोबत घडली चमत्कारिक गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल हैराण!
Venktalaxmi
| Updated on: Jan 13, 2026 | 12:51 PM

निसर्गाचा करिष्मा आणि मानवी संवेदनांची अशी एक गोष्ट समोर आलीय जी ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील. ज्या आईला मृत मानून मुलगा अंत्यसंस्काराची तयारी करत होता, ती अडीच वर्षानंतर अचानक जिवंत होऊन परतली. ही गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटू शकते. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात वास्तवात हे घडलय. प्रकाशम जिल्ह्यात कोटा गावात राहणाऱ्या वेंकटालक्ष्मी मानसिक दृष्ट्‍या अस्वस्थ होत्या. जवळपास अडीच वर्षांपूर्वी नातेवाईक तिला उपचारासाठी गुंटूरच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथून त्या अचानक बेपत्ता झाल्या. नातेवाईकांनी त्यांचा प्रत्येक ठिकाणी शोध घेतला. पण काही पुरावा हाती लागला नाही. दु:खद गोष्ट ही होती की, पत्नीच्या वियोगामध्ये तीन दिवसात पतीचं निधन झालं. वेळ निघून गेल्यानंतर कुटुंबानेही अपेक्षा सोडून दिल्या.

अडीचवर्षांचा काळ लोटल्यानंतर वेंकटालक्ष्मीचा काही शोध लागला नाही. कुटुंबाने हिंदू रितीरिवाजानुसार त्यांना मृत मानलं. घरात त्यांच्या अंत्यसंस्काराची, पिंडदानाची तयारी सुरु होती. त्याचवेळी अचानक खम्मम अन्नम सेवा आश्रमातून एक फोन आला. फोन करणाऱ्याने जे सांगितलं, ते ऐकून कुटुंबियांना विश्वासच बसला नाही. समोरच माणूस फोनवरुन सांगत होता की, तुमची आई जिवंत आहे आणि आमच्याकडे सुरक्षित आहे.

दु:ख अश्रुंच्या माध्यमातून बाहेर आलं

खम्मम पोलिसांना जुलै 2023 मध्ये वेंकटालक्ष्मी रस्त्यावर फिरताना सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांना सेवा आश्रमात भरती करण्यात आलं. आश्रमाचे संचालक अन्नम श्रीनिवास राव यांनी सांगितलं की, दीर्घ उपचार आणि देखभाल केल्यानंतर आईची मानसिक स्थिती सुधारली. प्रकृती सुधारताच त्यांनी गाव आणि मुलगा गुरवैया यांच्याबद्दल माहिती दिली. मुलगा गुरवैया आश्रमात पोहोचला. आई जिवंत असल्याच पाहून त्याचे डोळे पाणावले. अडीच वर्षांचं दु:ख अश्रुंच्या माध्यमातून बाहेर आलं. आश्रमाच्या आयोजकांनी कुटुंबाला सन्मानित करुन वेंकटालक्ष्मी यांना मुलाकडे सोपवलं.

सेवा आणि समर्पण कधीच व्यर्थ जात नाही

ही घटना आपल्याला शिकवते की, सेवा आणि समर्पण कधीच व्यर्थ जात नाही. अन्नम सेवा आश्रम सारख्या संस्थेमुळे आज एक मुलगा आपल्या आईला भेटला. घरात पुन्हा आनंद परतला. जे घर काल दु:खामध्ये बुडालेलं, तिथे आज आनंद, उत्सवाचा माहौल आहे.