Spy Cockroaches: ड्रोननंतर आता झुरळं, युद्धात कॉकरोच करतील हेरगिरी! नवीन तंत्रज्ञानाने जगाला धक्का

Swarm Biotactics: भारत-पाकिस्तान असो की, रशिया-युक्रेन अथवा आताचे इराण-इस्त्रायल युद्ध असो ड्रोनचा सर्रास वापर करण्यात येत आहे. पण या ड्रोनपेक्षा पण घातक शस्त्राचा वापर होणार आहे. हो झुरळं हेरगिरी करतील आणि शत्रूची खडानखडा माहिती देतील. नवीन तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Spy Cockroaches: ड्रोननंतर आता झुरळं, युद्धात कॉकरोच करतील हेरगिरी! नवीन तंत्रज्ञानाने जगाला धक्का
Spy Cockroaches Germany
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2026 | 1:55 PM

Spy Cockroaches: पाकिस्तान आणि भारत, रशिया-युक्रेन अथवा आता इस्त्रायल-इराण असो या युद्धात एक गोष्ट एकसमान होती, ती म्हणजे ड्रोनचा सर्रास वापर.आता तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. शस्त्राचा अचूक आणि भेदक मारा करण्यात येत आहे. दूरवरून एखादे लक्ष्य अचूक टिपण्यात येत आहे.जर्मनीतील संरक्षण क्षेत्रामधील एका कंपनीने तर अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. मनुष्यरहित AI आधारीत शस्त्रांच्या निर्मितीचा आणि उत्पादनाचा प्रयत्न ही कंपनी करत आहे. या कंपनीने झुरळाकडून हेरगिरीचा प्रयोग सुरू केला आहे. त्याने जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Reuters च्या अहवालानुसार, जर्मन स्टार्टअप्स Swarm Biotactics असे सायबॉर्ग झुरळं तयार करत आहे जे इलेक्ट्रॉनिक सिग्नलने नियंत्रित असतील. म्हणजे या कंपनीने झुरळासारखे एक यंत्र विकसीत केले आहे. हे झुरळ शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करेल. AI आणि न्यूरल-स्टिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हे झुरळ इत्यंभूत माहिती जमा करेल. त्यामुळे शत्रू राष्ट्रावर हल्ला चढण्यास मदत होईल.

बायो-रोबोटची चर्चा

या कंपनीचे CEO स्टेफन विल्हेल्म यांच्या मते बायो-रोबोट स्वॉर्ममध्ये काम करेल. म्हणजे एकाचवेळी कॉकरोचची फौज शत्रू राष्ट्रात घुसवता येईल आणि माहिती जमा करता येईल. झुरळाच्या पाठीवर मिनी सेन्सर असेल. त्यातून सुरक्षित संवाद साधता येईल. हा छोटा जीव एक मोठे ऑपरेशन सहज पेलेल आणि ते तडीस नेईल. जर्मनी संरक्षण खात्याचा चेहरा अमुलाग्र आणि बेमालूमपणे बदलवत असताना या झुरळाच्या फौजेची जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

जर्मनी संरक्षण तंत्रज्ञानाचे केंद्र

पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातील विनाशामुळे जर्मनी सातत्याने युद्धापासून चार हात दूर होता. शांतता धोरण या देशाने राबवले. या देशाचे सैन्य, संरक्षणावरील खर्च, शस्त्रांवरील खर्चही अगदी मर्यादित होता. पण सध्याच्या भू राजकीय घडामोडींमुळे या देशाने आता हे अलिप्ततावादी धोरण सोडले आहे. अमेरिकेची दादागिरी तर दुसरीकडून रशियाची युरोपियन राष्ट्रांवरील वक्रदृष्टी यामुळे स्वतःचे आधुनिक आणि एक मजबूत सैन्य असावे असे जर्मनाला वाटत आहे. जर्मनीने 2029 पर्यंत संरक्षण खर्चावर 162 अब्ज युरो दरवर्षी खर्च करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी सरकार AI, रोबोटिक्स आणि स्टार्टअप टेक्नोलॉजी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर निधी पुरवत आहेत. त्यातून असे हटके संरक्षण तंत्रज्ञान प्रयोग समोर येत आहेत.

युद्धच नाही तर झुरळ नैसर्गिक संकटातही मदतीला

झुरळाचं हे नवीन तंत्रज्ञान केवळ युद्धच नाही तर नैसर्गिक संकटातही मदतीला येणार आहे. नैसर्गिक संकटात जसे भूकंप, भूस्खलन, खाण, सुरूंग, जंगलातील अडचणीच्या काळात झुरळाची मदत मिळणार आहे. तर एखाद्या इमारतीत लोक अडकले असतील. आणीबाणीची परिस्थिती असेल अशावेळी हे झुरळ मदतीला येणार आहे. तर संकटात अडकलेली माणसं, कुठे फसलेली माणसं शोधण्यासाठी झुरळांचा वापर होणार आहे.

Follow Us