Pranit More : आमचे पॅड्स सुद्धा 370 रुपयांपेक्षा..घाणेरड्या जोक्सवरुन पूनम पांडेने प्रणित मोरेला फटकारलं

Pranit More : हिमांशु जेव्हा एका मुलीबद्दल इतकं अभद्र बोलत होता, तेव्हा त्याला रोखण्याऐवजी शो चा होस्ट प्रणित आणि त्या शो मध्ये आलेले प्रेक्षक हसत होते. त्याला अजून प्रोत्साहन देत होते.

Pranit More : आमचे पॅड्स सुद्धा 370 रुपयांपेक्षा..घाणेरड्या जोक्सवरुन पूनम पांडेने प्रणित मोरेला फटकारलं
poonam pandey-pranit More
| Updated on: Jun 12, 2026 | 8:54 AM

कॉमेडी शो मध्ये बोल्ड कंटेटवर भर देणारा प्रणित मोरे वादात सापडला आहे. बिग बॉस 19 ही सुद्धा त्याची ओळख आहे. सध्या हा स्टँड अप कॉमेडीयन त्याच्या शो मधील घाणेरड्या जोक्समुळे वादात सापडला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. प्रणितच्या शो मध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या हिमांशु जांगडा या मुलाने महिलांबद्दल खूप खालच्या पातळीचं वक्तव्य केलं. समाजात आपण महिलांना आदराचं स्थान देतो. स्त्री वेगवेगळ्या भूमिकांमधून कुटुंब घडवताना अप्रत्यक्षपणे चांगला समाज घडवत असते. पण प्रणित मोरे आणि हिमांशु जांगडा सारखे सुद्धा काही अपवाद असतात. हिमांशु जांगडाच्या स्टेटमेंटनंतर कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. सोशल मिडियावर या क्लिप्स व्हायरल झाल्या. 370 रुपये बिर्याणीचा हा विषय चांगलाच गाजत आहे. प्रणित मोरेंच्या विचारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हिमांशु जेव्हा एका मुलीबद्दल इतकं अभद्र बोलत होता, तेव्हा त्याला रोखण्याऐवजी शो चा होस्ट प्रणित आणि त्या शो मध्ये आलेले प्रेक्षक हसत होते. त्याला अजून प्रोत्साहन देत होते. या वादग्रस्त विषयावर आता अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. तिला हिमांशु जांगडाची विचार करण्याची पद्धत बिलकुल आवडली नाही. पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय. त्यात ती 370 रुपये बिर्याणीच्या जोकवर व्यक्त झाली आहे. “भाई,काय चाललय मार्केटमध्ये..मी 370 रुपये बिर्याणीची स्टोरी ऐकली. वाह बेटा काय विचार करतोस तू. मी तुला एक गोष्ट सांगीन, आम्हा महिलांना दर महिन्याला पीरियड्स येतात. त्यासाठी आम्ही पॅड्स वापरतो. आमचे पीरियड्सचे पॅड्स सुद्धा 370 रुपयापेक्षा महाग असतात. ते आम्ही वापरुन फेकून देतो. तोंड सांभाळून बोल. तू स्त्रिया बद्दल बोलतो आहेस हे लक्षात ठेवं”

त्या मुलीला ऐकावं लागतय

प्रणित मोरेच्या या शो मध्ये हिमांशु जांगडा शिवाय एका मुलीचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात तिने मृतदेहाबद्दल घाणेरडी कमेंट केली. शो मध्ये आलेली ही मुलगी डॉक्टर आहे. डॉक्टर असल्याने डेड बॉडी ओपन करुन अवयवांचा अभ्यास करतो असं तिने सांगितलं. डेड बॉडीच्या प्रायवेट पार्टवर ती मस्करीमध्ये बोलली. यात प्रणित मोरे तिला अजून प्रोत्साहन देत होता. डॉ. सेजल पवार या मुलीला आता सोशल मीडियावर बरच काही ऐकावं लागत आहे. हिमांशु जांगडाला नोकरीवरुन काढून टाकलय.

 

Follow Us