
जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या दुःखातून सावरणे सर्वात कठीण असते. एखाद्या मुलीने आपला बाप गमावला तर तिला होणारे शब्दात मांडता येत नाही. अमेरिकेतील एका मुलीच्या वडिलांचे निधन झाले, यामुळे तिला खूप दु:ख झाले. अंत्यसंस्काराला नातेवाईक आणि जवळचे लोक जमले होते. त्यावेळी एक अनोळखी महिला आली आणि तिने मुलीला अशी माहिती सांगितली ज्यामुळे ती स्तब्ध झाली. याबाबतचा अनुभन या मुलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेतील एका तरूणीला आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी खतरनाक अनुभव आला. तिचा वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना एक अनोळखी महिला आणि दोन मुले तिथे पोहचली. त्यानंतर त्या महिलेने असे काही सांगितले, ज्यामुळे तरुणीला धक्का बसला. मिररने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, या मुलीने रेडिटवर तिची कहाणी शेअर केली आहे.
यात तिने म्हटले की, ‘माझे वडील एक सामान्य पुरुष होते जे अनेक दशकांपासून माझ्या आईसोबत सामान्य जीवन जगत होते. त्यांनी अलिकडेच त्यांच्या लग्नाचा 40 वा वाढदिवस साजरा केला होता.’ मात्र त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक एक महिला आणि दोन किशोरवयीन मुले तिथे आली. ती महिला मुलीकडे गेली आणि तिच्या कानात म्हणाली की, ‘मला बोलायचे आहे, मी डेनिस आहे. मी 15 वर्षांपासून तुझ्या वडिलांसोबत होते.’
महिलेचे हे विधान ऐकल्यानंतर त्या मुलीला वाटले की, हा गैरसमज असेल, मात्र त्या महिलेने दोघांचे फोटो दाखवले, हे फोटो वाढदिवस, ख्रिसमसचे होते, ज्यामध्ये तिचे वडील स्पष्टपणे दिसत होते. त्या महिलेने सांगितले की, ‘तुझ्या वडिलांनी मला सांगितले होते की माझी पत्नी मरण पावली आहे.’ मात्र सत्य हे होते की, मृत व्यक्ती दोन दशकांपासून दोन महिलांचा पती म्हणून वावरत होता.
कामानिमित्त बाहेर जात ते अर्धा वेळ दुसऱ्या महिलेसोबत घालवत होते आणि उर्वरित वेळ त्याच्या खऱ्या कुटुंबासोबत घालवायचे. सोशल मिडिया पोस्टमध्ये या मुलीने म्हटले की, ‘जेव्हा मी माझ्या आईला याबाबत सांगितले तेव्हा तिचे मन पूर्णपणे तुटले होते. तिला कल्पनाही नव्हती की तिचा नवरा इतक्या वर्षांपासून तिच्याशी खोटे बोलत आहे.’