स्वत:च्याच लॅपटॉपला आगी लावत आहेत विद्यार्थी, व्हायरल होत आहे अजब ट्रेंड, कारण काय ?

सोशल मीडियावर तरुण कोणत्या गोष्टीचा ट्रेंड सुरु करतील याचा काही नेम नाही. कधी एखादे गाणे, किंवा एखादी डान्सची स्टेप व्हायरल होते. तर कधी कुठला चहावाला हीरो ठरतो.

स्वत:च्याच लॅपटॉपला आगी लावत आहेत विद्यार्थी, व्हायरल होत आहे अजब ट्रेंड, कारण काय ?
Chrome book Challange
| Updated on: May 10, 2025 | 9:24 PM

इंटरनेटच्या जगात कधी काय ट्रेंड येईल हे सांगू शकत नाही..अनेक व्हिडीओ आणि रिल्सचा रतीब दिवसरात्र इंटरनेट पडत असतो. जर साध्या शब्दात सांगायचे झाले तर हा सर्व खेळ लाईक्स आणि व्यूव्हज् मिळविण्याचा आहे. येथे लोक चॅलेंज तयार करतात आणि लोक त्याला व्हायरल करीत असतात. अशाच प्रकारे आता नवीन ट्रेंड व्हायरल होत आहे. येथे लोक चॅलेंजच्या चक्करमध्ये आपले नवे कोरे लॅपटॉप जाळून टाकीत आहेत.

या नवीन चॅलेंजला #क्रोमबुकचॅलेंज (#ChromebookChallange)… म्हटले जात आहे. यात मुलं एक प्रकारचा स्टंट करीत आहेत.ज्यात लॅपटॉपच्या चार्जिंग पॉईंटच्या फटीत काही जण कागदं, पेन्सिलचे शिसे किंवा फॉईल पेपर टाकत आहेत त्यामुळे शॉर्ट सर्कीट होत आहे. आणि लॅपटॉपमधून धुर येऊन त्याची बॅटरी पेट घेत आहे.

का धोकादायक ?

अमेरिकेतील कनेक्टिकटच्या न्युइंगटन हाय स्कुलमध्ये अशा चॅलेंजमुळे अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. न्युयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार शहराचे फायर मार्शल डी.जे.जॉर्डन यांनी सांगितले की या चॅलेंजमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण लॅपटॉपच्या बॅटरीच्या ज्वलनाने विषारी वायूंचे प्रमाण वाढले आहे. कारण लॅपटॉपच्या बॅटरीला त्वरीत आग पकडते. त्यामुळे विषारी वायू हवेत पसरत असून या मुळे अनेक केसमध्ये फायर ब्रिगेडला पाचारण करावे लागत आहे.

हा ट्रेंड धोकादायक का?

या नव्या चॅलेंजची अनेक प्रकरणे कॅलिफोर्निया, कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी, रोड आयलंड, विस्कॉन्सिन आणि वॉशिंग्टन सारख्या अमेरिकन शहरात दिसली आहे.गेल्यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान टिकटॉकवरुन ९९.७% कंटेंट धोकादायक ठरवून काढला आहे. जनतेने आवाहन केले आहे की असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत, यामुळे तरुणांचे खूप नुकसान होत आहे.