AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: तैवान स्टार चेंग चांग फॅन भारतीय तरुणीच्या प्रेमात असल्याचं नाटक? व्हायरल व्हिडिओनंतर आता चकित करणारा खुलासा

Ching Chan Fan: तैवान अभिनेता आणि मॉडेल चेंग चांग फॅनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये तो एका भारतीय महिलेला मिठी मारताना आणि तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. आता या अभिनेत्या बद्दल एक चकित करणारा खुलासा समोर आला आहे.

Viral Video: तैवान स्टार चेंग चांग फॅन भारतीय तरुणीच्या प्रेमात असल्याचं नाटक? व्हायरल व्हिडिओनंतर आता चकित करणारा खुलासा
| Updated on: Aug 27, 2026 | 10:14 AM
Share

Cheng Chan Fan Video Viral: तैवान अभिनेता आणि मॉडेल चेंग चांग फॅनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये तो एका भारतीय महिलेला मिठी मारताना आणि तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून, सोशल मीडिया यूजरने त्यांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क लावले आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. 2025 मध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एका हॉटेलमधील महिला कर्मचारीने पारंपरिक आरती आणि तिलक लावून त्याचे स्वागत केले होते. यावेळी, चेंग तिच्याकडे प्रेमाने पाहताना दिसला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांच्या लक्षात त्यांचे नाते आले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

आता, जवळपास एक वर्षानंतर, चेंग चांगने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ही क्लिप आता त्याच्या अकाउंटवर दिसत नाही. या व्हिडिओमध्ये तो एका भारतीय महिलेला भेटताना आणि तिला मिठी मारताना दिसत आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की ही तीच हॉटेल कर्मचारी आहे जिला तो पहिल्यांदा भेटला होता.

चेंगने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्यानंतर त्याने याच तरुणीसोबतचे फोटो पोस्ट केले. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, त्याला भारतात आपलेपणाची भावना जाणवली, ज्यामुळे त्याला तेथील लोकांशी जोडल्यासारखे वाटले. त्याने हॉटेलमधील आपल्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली आणि भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

चेंग चांग फॅन हा एक तैवानी अभिनेता आणि मॉडेल आहे. वृत्तानुसार, तो तैपेईचा असून त्याने लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समध्ये शिक्षण घेतले आहे. तो तैपेईमध्ये फुलांचा व्यवसायही चालवतो. चेंगने डिओर, ह्यूगो बॉस आणि बरबरी यांसारख्या ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केले आहे. तो २०२० च्या ‘क्रेविंग यू’ या ड्रामामधील भूमिकेसाठीही ओळखला जातो. त्याने २०२२ मध्ये ‘एन्ट नथिंग’ हे त्याचे एकल गाणेही प्रदर्शित केले. सध्या, चेंग आणि त्या भारतीय महिलेच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, परंतु त्या दोघांपैकी कोणीही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

पण आता या अभिनेताबद्दल चकित करणारा खुलासा समोर आला आहे. चेंग चांग फॅनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्स पुन्हा समोर येत आहेत, ज्यामुळे त्याच्या लैंगिकतेवर प्रश्न निर्माण होत आहे. सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहे. या पोस्टमधून तो गे असल्याचे समजत आहे. याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच