AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर राहतंय संपूर्ण कुटुंब, Viral Video मागील सत्य समोर

Fact Check Viral Video: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ खरे असल्यासारखेही वाटतात पण नंतर वेगळेच सत्य समोर येते.

Viral Video: काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर राहतंय संपूर्ण कुटुंब, Viral Video मागील सत्य समोर
| Updated on: Aug 25, 2026 | 2:26 PM
Share

Fact Check Video Viral: अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून डोळे विस्फारतात. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे, ज्यामध्ये एक कुटुंबाने उड्डाणपुलाच्या एका खूप उंच काँक्रीटच्या खांब्यावर आपला संसार थाटला आहे. जिना किंवा लिफ्ट नसताना, त्या ठिकाणी टीव्ही, कपडे आणि पाण्याची भांडी पाहून सर्वांना धक्का बसला आहे. काहीजण याला गरिबीचे प्रतीक म्हणत आहेत, तर काहीजण ही घटना भारतातील असल्याचे सांगत आहेत. पण या व्हिडिओमधील दावा खरोखरच खरा आहे का?

या १५-सेकंदांच्या क्लिपमध्ये, एक महिला उड्डाणपुलाच्या उंच खांबावर कपडे वाळवताना दिसत आहे, तर दोन पुरुष जवळच बसलेले आहेत. तिथे टेलिव्हिजन, पाण्याची भांडी आणि कपडे यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. कॅप्शनमध्ये विनोदी पद्धतीने याचे वर्णन ‘लिफ्ट नसलेला पहिल्या मजल्यावरील फ्लॅट’ असे केले आहे.

सुरुवातीला, हा व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा करून शेअर करण्यात आला होता, परंतु युजरने वाहनांच्या मॉडेल्सवर आणि उपस्थित लोकांच्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ग्रोक (Grok) नावाच्या Ai च्या हवाल्याने असा दावा करण्यात आला होता की, हे नायजेरियातील लागोस येथील दृश्य आहे, जिथे घरांच्या टंचाईमुळे लोकांना अशा परिस्थितीत राहण्यास भाग पडले आहे. स्थानिक नायजेरियन सोशल मीडिया यूजरने अशी कोणतीही घटना घडत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आणि हे पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले जात आहे.

जेव्हा व्हायरल व्हिडिओची चौकशी केली गेली, तेव्हा सत्य वेगळेच समोर आले. जेव्हा ही क्लिप एआय डिटेक्शन टूल्सद्वारे तपासली गेली, हा व्हिडिओ 97% एआय-निर्मित आहे असं समजले. त्याच वेळी, शिडी, दोरी किंवा लिफ्टशिवाय इतके जड सामान इतक्या उंचीवर नेणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. हल्ली एआयचा वापर खूपच केला जातो हे स्पष्टपणे दिसत आहे. एआयचा वापर हल्ली सर्रास केला जातो.  मूळ फोटोला बदलून एआयच्या वापराने त्याचे संपूर्ण चित्रच बदलले जाते. यामुळे आता जी गोष्ट प्रथम पाहतो तिच्यावर विश्वास ठेवून तीच खरी आहे हे समजणं आता चुकीचे ठरेल.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?