डान्स फ्लोअरवर पती करत होता रोमान्स, नाचता नाचता पत्नीला कवेत घेतले अन्…

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक या कपलच्या डान्सची खूप मजा घेत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

डान्स फ्लोअरवर पती करत होता रोमान्स, नाचता नाचता पत्नीला कवेत घेतले अन्...
विवाह समारंभातील कपल डान्स व्हायरल
Image Credit source: social
| Updated on: Nov 03, 2022 | 11:06 PM

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नात संगीत पार्टी आणि हळदी समारंभात डिजेवर नाचण्याचा तसेच कपल डान्सचा ट्रेंड आला आहे. तरुणांपासून वयोवृद्ध जोडप्यांपर्यंत सर्वच नाचण्याचा आनंद लुटतात. कधी कधी नाचण्याच्या नादात काही लोकांना कशाचेच भान राहत नाही. मग कधी अपघातासारख्या घटना घडतात, तर कधी उपस्थितांना पोट धरुन हसवणारे किस्से घडतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाचताना पती इतका रोमँटिक होतो की त्यानंतर जे घडते ते पाहून उपस्थितांना हसू आवरणे मुश्किल होते.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन जोडपे डान्स फ्लोअरवर डान्स करताना दिसत आहेत. नाचता नाचता एक व्यक्ती रोमँटिक मूडमध्ये येतो आणि आपल्या जोडीदाराला कवेत उचलू लागतो.

जसे तो महिलेला आपल्या कवेत उचलतो, तसे दोघेही धाडकन जमिनीवर पडले आणि तिथे उपस्थित असलेले सर्वजण त्यांना पाहून हसू लागले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक या कपलच्या डान्सची खूप मजा घेत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज

आतापर्यंत हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्सही येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, गरीब माणूस कोणताही सराव न करता रिंगणात उतरला. तर दुसर्‍याने लिहिले आहे की, हिरो बनण्याची काय गरज होती.