बैलानं 7 फुटाच्या भिंतीवरुन मारली जबरदस्त उडी, व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले!

आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात एका बैलाने असा काही स्टंट केला की, लोक थक्क झाले. खरं तर, बैलाने इतकी जबरदस्त उडी मारली, ज्याची आपल्यापैकी कुणीही कल्पनाही करू शकत नाही.

बैलानं 7 फुटाच्या भिंतीवरुन मारली जबरदस्त उडी, व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले!
सोशल मीडियावरही बैलाच्या या अनोख्या स्टंटच्या व्हिडीओची बरीच चर्चा रंगली आहे
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 6:32 PM

आपल्या जगात एकापेक्षा एक टॅलेंटेड लोक आहेत. जे आपल्या क्षमतेच्या जोरावर कुणालाही त्यांचं फॅन बनवू शकतात. पण जेव्हा एखादा प्राणी काहीतरी वेगळे करतो, तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात येणं गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात एका बैलाने असा काही स्टंट केला की, लोक थक्क झाले. खरं तर, बैलाने इतकी जबरदस्त उडी मारली, ज्याची आपल्यापैकी कुणीही कल्पनाही करू शकत नाही. ( The bull jumped over a 7-foot wall. The video went viral )

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, पाहू शकता की, बंदिस्त कुंपणात अनेक बैल आहेत, त्याचवेळी एक बैल त्या कुंपणातून उडी मारतो आणि बाहेर जातो. बैलाला इतक्या नेत्रदीपक शैलीत उडी मारताना पाहून लोक दंग झाले आहेत. आता सोशल मीडियावरही बैलाच्या या अनोख्या स्टंटच्या व्हिडीओची बरीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना रिव्हर्स प्ले केलेला आहे, त्यामुळे बैल कुंपणात येत असल्याचा भास होतो, मात्र हा बैल बाहेर जातानाचा व्हिडीओ आहे, ज्याला एडिटींगमध्ये रिव्हर्स इफेक्ट देण्यात आला आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘hepgul5’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका नेटकऱ्याने यावर लिहलं की, व्हिडिओमध्ये बैलाने दाखवलेला पराक्रम क्वचितच पाहायला मिळतो. बऱ्याचदा सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ असतात, पण काही व्हिडिओ असे असतात की ज्यावर सर्वांचं लक्ष जातं. अनेक व्हिडीओत माणसांपेक्षा प्राणी किती हुशार आणि किती कलाकार आहेत, हे दिसतं, त्यामुळेच अशा व्हिडीओंत सोशल मीडियावर पसंत केलं जातं.

हेही पाहा:

Video: जेरीने टॉमला ‘जेरीस’ आणलं, अगदी समोर बसुनही उंदराने मांजराला गंडवलं, पाहा व्हिडीओ

Viral Video : बेबी पांडाचा क्युट व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू फुलेल