Video : हाथी मेरे साथी!, हत्तीची तरूणासोबत मजा-मस्ती, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

हा व्हीडिओ जवळपास लाखभर लोकांनी पाहिलाय. तर सहा हजारांहून अधिकांनी याला लाईक केलंय. तर काहींनी रिट्विट करत आपलं हत्ती प्रेम दाखवून दिलंय.

Video : हाथी मेरे साथी!, हत्तीची तरूणासोबत मजा-मस्ती, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
व्हायरल व्हीडिओ
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 10:50 AM

मुंबई : हत्ती (Elephant) अनेकांच्या आवडीचा विषय… अनेकांना हत्ती हा प्राणी आवडतो. अनेकांना जिव्हाळा असतो. हत्तीचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. यात हत्ती एका तरूणासोबत मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहे.व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये हत्तीचं लहान पिल्लू जंगलात झोपलेल्या माणसासोबत मजा करताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये एक हत्ती झोपलेल्या माणसाला लाथ मारून उठवताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एक हत्तीचं पिल्लू कुंपणाबाहेर येताना पाहायला मिळत आहे. यात त्याच्या मागे एक हत्तीही दिसत आहे. हा छोटा हत्ती बाहेर आल्यावर त्याला एक तरूण निवांत झोपलेला दिसतो. मग या हत्तीचा मजा करण्याचा मूड होतो. अन् तो या तरूणाची चांगलीच मजा घेतो.

हत्ती एका तरूणासोबत मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये हत्तीचं लहान पिल्लू जंगलात झोपलेल्या माणसासोबत मजा करताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये एक हत्ती झोपलेल्या माणसाला लाथ मारून उठवताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक मिनिट 8 सेकंदांचा हा व्हीडिओने अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हा व्हीडिओ अनेकांना हसवतोय. हा व्हीडिओ डॉ. सम्राट गोवडा या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला “ए ही माझी जागा आहे, माझा बेड आहे तू इथे कसा काय झोपलास? उठ चल…” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

हा व्हीडिओ जवळपास लाखभर लोकांनी पाहिलाय. तर सहा हजारांहून अधिकांनी याला लाईक केलंय. तर काहींनी रिट्विट करत आपलं हत्ती प्रेम दाखवून दिलंय.

हा व्हीडिओ ज्या व्यक्तीने शेअर केलाय ती व्यक्ती फॉरेस्ट ऑफिसर आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या ट्विटरवरून विविध प्राणी पक्ष्यांचे व्हीडिओ-फोटो ट्विट केल्याचं पाहायला मिळत आहेत.