AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित आणि विराटला हात लावण्याचा विचारही करू नका… वर्ल्डकपआधी गंभीर-आगरकर जोडीला थेट इशारा

Ravichandran Ashwin On ROKO: रोहित-विराटला ड्रॉप करण्याचा विचारही कठीण आहे, अश्विनने गंभीर-आगरकरांना थेट इशारा दिला आहे.

रोहित आणि विराटला हात लावण्याचा विचारही करू नका... वर्ल्डकपआधी गंभीर-आगरकर जोडीला थेट इशारा
| Updated on: Oct 02, 2026 | 11:00 PM
Share

माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्याने गौतम गंभीर आणि अजित आगरकरांना इशारा दिला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीवरून त्याने हा इशारा दिला आहे. त्यानंतर आता याची चर्चा होत आहे. रविचंद्रन अश्विनने असा दावा केला आहे की, संघातून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वगळणे अशक्य होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेनंतर अश्विनने हे विधान केले आहे. हिटमॅनने लॉर्ड्सवर एका शानदार खेळीने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले होते. त्याने निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनने नमूद केले की, रो-को चा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांना वगळल्यास सामन्यांसाठी प्रेक्षकांची उपस्थिती कमी होऊ शकते, असं त्याने सांगितले आहे.

यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये अश्विन म्हणाला की, जर रोहित आणि विराटने खेळणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तर कोणीही त्यांना संघातून वगळू शकणार नाही, कारण त्यांची कामगिरी अफाट आहे. या दोन दिग्गजांचा मोठा चाहतावर्ग आहे. जर त्यांना संघातून वगळले गेले, तर होणारा आवाज कानठळ्या बसवणारा असेल, कारण त्यांना खेळताना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येतात.

या दोघांनी नुकताच इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी आपला ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. जर त्यांना खेळायचे असेल, तर ते विराट आणि रोहितला हात लावू शकत नाहीत. हे त्यांच्या कर्तृत्वामुळे आहे. रोहितने जवळपास १२,००० धावा केल्या आहेत. ते त्याला हात लावू शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ते फलंदाज आहेत आणि जर तुम्ही त्यांना हात लावलात, तर त्यांच्यासमोर एक फौज उभी असते. लोक त्यांना पाहण्यासाठी येतात. जर तुम्ही त्यांना संघातून वगळले, तर स्टेडियममध्ये अक्षरशः धुमाकूळ माजेल, असे अश्विन म्हणाला.

लॉर्ड्सवरील खेळीबद्दल अश्विनने रोहित शर्माचे कौतुक केले. त्याने म्हटले की, जर तो चांगल्या फॉर्ममध्ये असता तर त्याने १८० धावा केल्या असत्या. या सामन्यात ‘हिटमॅन’वर प्रचंड दबाव होता. विशेषतः अशा वृत्तांमुळे की, निवड समितीने त्याला कळवले होते की आता त्याचा संघात समावेश नाही. रोहित रविवारी निवृत्तीची घोषणा करू शकतो, असेही वृत्त होते. ज्यामुळे बीसीसीआयला स्पष्टीकरण जारी करून हे दावे फेटाळून लावावे लागले. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना शर्माने १३८ धावा केल्या, जरी संघाला पराभव पत्करावा लागला.

मला वाटलं की रोहित खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता. तो ज्या परिस्थितीत आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाजी केली. ते त्याच्यासाठी फारसं कठीण नाही. आपण त्याला इतक्या वर्षांपासून पाहत आलो आहोत; आता त्याला काहीही सिद्ध करायचं उरलेलं नाही. त्याला कोणाला सिद्ध करायचं आहे? हा फक्त आंतरिक इच्छेचा प्रश्न आहे. मला विश्वचषकात जायचं आहे, म्हणूनच मला अशाप्रकारे खेळण्याची गरज आहे, असे अश्विन पुढे म्हणाला.

Follow Us
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप