AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ClickFix Scam : एक क्लिक अन् बँक खातं रिकामं? ‘ClickFix’ स्कॅमपासून सावध राहा ; कसं वाचायचं जाणून घ्या

इंटरनेटवर एखादी वेबसाईट उघडली की आपण अनेकदा वेरिफिकेशन कॅप्चा, वेरिफिकेश बॉक्स , i am not a robot, किंवा verify you are not human या पर्यायावर क्लिक करतो. पण आता याच सवयीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. Click fix नावाच्या नव्या सायबर फसवणुकीत बनावट व्हेरिफिकेशन पेज दाखवून वापरकर्त्यांकडूनच धोकादायक क्लिक करून घेतले जाते.त्यामुळे लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये […]

ClickFix Scam : एक क्लिक अन् बँक खातं रिकामं? ‘ClickFix’ स्कॅमपासून सावध राहा ; कसं वाचायचं जाणून घ्या
click fix scamImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 20, 2026 | 4:27 PM
Share

इंटरनेटवर एखादी वेबसाईट उघडली की आपण अनेकदा वेरिफिकेशन कॅप्चा, वेरिफिकेश बॉक्स , i am not a robot, किंवा verify you are not human या पर्यायावर क्लिक करतो. पण आता याच सवयीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. Click fix नावाच्या नव्या सायबर फसवणुकीत बनावट व्हेरिफिकेशन पेज दाखवून वापरकर्त्यांकडूनच धोकादायक क्लिक करून घेतले जाते.त्यामुळे लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये मालवेअर घुसू शकते आणि वैयक्तिक माहिती आणि डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे.

नेमका कसा होतो Click Fix स्कॅम

या स्कॅममध्ये एखादी वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रिनवर CAPTCHA किंवा ‘i am not a robot’ असा मेसेज दिसतो. तो अगदी खऱ्या व्हेरिफिकेशन पेज सारखा दिसतो. आपण त्यावर क्लिक करतो आणि त्यानंतर त्याला काही विचित्र सूचना दिल्या जातात.

उदाहरणार्थ कि बोर्डवरील WINDWS + R ही बटणं दाबा, त्यानंतर CTRL + V आणि ENTER दाबा, असं सांगितलं जातं. या प्रक्रियेत वेबसाईटने आधीच क़ॉपी केलेले धोकादायक कमांड फोन किंवा लॅपटॉपच्या रन विंडोमध्ये पेस्ट होते.त्यानंतर हकर्सच्या नियंत्रणाखाली सर्व्हरवरून मालवेअर डाऊनलोड होऊन फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इनस्टॉल होण्याची शक्यता असते. या मालवेअरच्या मदतीने सगळ्याचे पासवर्ड अगदी बॅकिंगपासून माहिती आणि इतर डेटा चोरला जातो. काही प्रकांरांमध्ये रॅन्समवेअर किंवा संगणकावर प्रोग्रामही पाठवले जाऊ शकतात

CLICK fix स्कॅमपासून कसं वाचाल?

कोणतीही वेबसाईट CAPTCHA पूर्ण करण्यासाठी WINDOWS + R, POWERSHELL किंवा TERMINAL उघडण्यास सांगत असेल, तर सावध व्हा.

अनोळखी वेबसाईटने दिलेली कमांड कॉपी करून फोनवर किंवा संगणकात पेस्ट करू नका. संशयास्पद व्हेरिफिकेशन पेज दिसल्यास त्यावर दिलेल्या सूचना न पाळता वेबसाईट बंद करा.

संगणकातील सुरक्षा प्रणाली आणि ब्राउझर नियमित अपडेट ठेवा. ई- मेल, बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या खात्यांसाठी मजबूत पासवर्ड आणि सुरक्षा राखा.

चुकून कमांड चालवली तर काय कराल?

जर अशा पेजवरील सूचना पाळून कमांड चालवली असेल, तर इंटरनेट कनेक्शन बंद करा आणि विश्वासार्ह सुरक्षा प्रणालीच्या मदतीने संगणकाची तपासणी करा.महत्त्वाचे पासवर्ड सुरक्षित असलेल्या दुसऱ्या उपकरणावरून बदला. बँकेशी संबंधित माहिती धोक्यात आल्याची शंका असल्यास तातडीने बँकेला कळवा.

Follow Us
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर