
मुंबई : सद्या अनेक तरुणांच्या डोक्यावर स्टंटचं भूत आहे. त्यामुळे अनेकजण स्टंट करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्यात करुन अनेक युवा इंस्टाग्रामवरती स्टंट करुन रिल्स (Stunt Viral Video) तयार करीत आहेत. सध्या सोशल मीडियावर (social media) असंख्य व्हिडीओ रस्त्यात बाईक आणि कारचे स्टंट करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एका तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. ज्यावेळी तरुणी स्टंट (Stunt) करायला जाते आणि तोंडावर पडते.
अनेकदा लोकांना स्टंट दाखवण्याच्या नादात अनेक लोकं पडतात. त्यांच्या चुकीमुळे अनेकदा लोकं पडतात असं पाहायला मिळालं आहे. आतापर्यंत लोकांना असे व्हिडीओ पाहायला अधिक आवडले आहेत. सोशल मीडियावर सद्या अशाचं पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. एवढं मात्र निश्चित. व्हिडीओमध्ये एक तरुण स्पोर्टस बाईक चालवून स्टंटबाजी करीत आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवरती @TheBest_Viral नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एक तरुणी उंच टाचेचं चप्पल घालून स्पोर्टस बाईकवरती स्टाईल मारुन बसण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी तिच्याकडून एक छोटीसी चुकी होते आणि तिचा बॅलेन्स बिघडून जातो. त्यामुळे ती अचानक जमीनीवर पडते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं तिला खळखळून हसतात.
Cat dexterity pic.twitter.com/Rhfucw8hpE
— Lo+Viral ? (@TheBest_Viral) April 16, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक लाख 26 हजार लोकांनी पाहिला आहे. त्यावर लोकं कायम प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘याला म्हणतात रेझर माकडाच्या हाती देणे.’ दुसर्या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘पप्पाच्या परी उडण्यात अडकल्या’. तिसरा नेटकरी म्हणतो की, हे ओव्हर स्मार्ट असण्याचा परिणाम आहे. या क्षणी, एका व्यक्तीने मुलीच्या समर्थनार्थ टिप्पणी केली आणि लिहिले, ‘जे प्रयत्न करतात ते कधीही पराभूत होत नाहीत… कायम ठेवा’.