VIDEO | माणसाने आपल्या हाताने चिंपांझीला पाणी पाजले, मग प्राण्याने बदल्यात…, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडिओ

Chimpanzee Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने चिंपांझीला पाणी पाजले अजून त्या बदल्यात त्या चिंपांझीला जो प्रतिसाद दिलाय ते पाहून नेटकरी भारावून गेल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

VIDEO | माणसाने आपल्या हाताने चिंपांझीला पाणी पाजले, मग प्राण्याने बदल्यात..., आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडिओ
Chimpanzee Video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2023 | 3:04 PM

मुंबई : तुम्ही सोशल मीडियावर समजा सक्रीय असाल, तर तुम्ही अनेक प्राण्यांचे व्हिडीओ (Viral Video) पाहिले असतील. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांचं मन जिंकतात. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर दु:ख होतं. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही चिंपांझी (Chimpanzee Video) नक्की पाहिला असेल, प्रत्यक्षात पाहिला नसेल तरी व्हिडीओत आणि चित्रात नक्की पाहिला असेल. जंगलात एक फोटोग्राफर फिरत आहे, त्यावेळी त्याच्या चिंपांझी मदत मागत आहे. ती मदत काय आहे हे तुम्ही व्हिडीओत पाहा. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ने वीडियो शेअर केला आहे.

त्या व्हिडीओत काय आहे ?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत चिंपांझी तिथं असलेल्या फोटोग्राफरकडे पाणी पिण्यासाठी मदत मागत आहे. त्यावेळी त्या व्यक्तीने त्या चिंपांझीला पाणी पाजले आहे. त्यानंतर त्या चिंपांझीने त्याचे दोन्ही हात स्वच्छ धुवून दिले आहेत. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा नियम तुमच्या ऑफिसमध्ये सुध्दा समान आहे. समजा तुम्ही एखाद्या समुहात काम करताय किंवा कार्यालयात काम करीत असाल, त्यावेळी तुम्हाला सुध्दा अशी मदत लागू शकते.

या देशातील व्हिडीओ…

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ साधारण एक आठवडाभरापुर्वी व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ आफ्रिका देशातील कैमरुन या जंगलातील आहे. एक चिंपांझी एका व्यक्तीकडं मदत मागत आहे. पुन्हा त्या व्यक्तीचे खराब झालेले हात सुध्दा धूत आहे. हे खरंतर एक मोठं उदाहरण आहे. समजा तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकांची मदत करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला समर्थन मिळेल.