Viral Video : डासाला मारण्यासाठी त्याने जे केलं, ते पाहून तुम्ही म्हणाल आजार परवडला पण औषध नको

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला पाहून तुम्हाला आ बैल मुझे मार, अपनी कुल्हाडी अपने ही पैर पर मारना अशा हिंदी म्हणी आठवतील.

Viral Video : डासाला मारण्यासाठी त्याने जे केलं, ते पाहून तुम्ही म्हणाल आजार परवडला पण औषध नको
trending video
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 16, 2023 | 3:06 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : तुम्ही राजा आणि त्याच्या लाडक्या माकडाची गोष्ट ऐकली असेल. एकदा राजाच्या नाकावर माशी बसते आणि माकड माशीला तलवारीने मारायला जाते आणि काय होतं ते ऐकले असेलच. तसेच प्रकरण आता एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आता एका मच्छराला मारायला गेलेल्या तरुणाने काय गेले ते पाहून तुम्हाला राजा आणि या माकडाची गोष्ट नक्कीच आठवेल…पाहा काय आहे हा व्हिडीओ

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला पाहून तुम्हाला आ बैल मुझे मार, अपनी कुल्हाडी अपने ही पैर पर मारना अशा हिंदी म्हणी आठवतील. या व्हिडीओत सुरुवातीलाच पाहायला मिळते की एक मच्छर एका व्यक्तीच्या पावलावर रक्त पिण्यासाठी बसला आहे. त्यानंतर पुढच्या क्षणाला ही व्यक्ती जे करते ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की जसा मच्छर पावलावर चावण्यासाठी बसला तसेच त्या तरुणाने हातोड्याने त्याच्यावर वार केल्याचे दिसेल. मच्छर तर मेला पण तरुणाच्या तोंडातून वेदनेची किंकाळी आली असेल कारण मच्छराला मारायाला होतोडी वापरल्याने त्या तरुणाचे बोट तुटल्याने हा उपाय त्याला भलताच महागल्याचे या व्हिडीओत स्पष्ट होईल. कारण व्हिडीओत पायाच्या बोटाचे हाड तुटलेल्याचा एक्सरे देखील तुम्हाला दिसेल.

येथे पाहा व्हिडीओ –

 

6.9 दशलक्ष लोकांनी पाहीला व्हिडीओ 

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर हैराण झाले आहेत. काही जण मजेशीर प्रतिक्रीयाही देत आहेत. 6 ऑगस्ट रोजी शेअर झालेल्या या व्हिडीओला 6.9 दशलक्ष लोकांनी पाहीले आहे. या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका युजरने म्हटले आहे की नशीब त्याने कुऱ्हाडीने मच्छरला कापले नाही. दुसऱ्या एका युजरने भावाने स्वत:चे नुकसान केले आहे.