कमेंट्सचा पाऊस, “कुणी काही बोलणार नाही, चूक ताईंची नव्हतीच, सगळी चूक त्या पुलाची!”

मुलीला इतरत्र जायचं होतं, पण तिने ब्रेकऐवजी एक्सीलरेटर फिरवला आणि मग असं घडलं ज्याची त्या मुलीने कदाचित कल्पनाही केली नसेल.

कमेंट्सचा पाऊस, कुणी काही बोलणार नाही, चूक ताईंची नव्हतीच, सगळी चूक त्या पुलाची!
accident video viral
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 21, 2023 | 6:04 PM

कुणी काही बोलणार नाही, सगळी चूक ब्रिजची होती. अहो…’दीदी’ तो हैवी ड्राइवर निकली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही क्लिप पाहून नेटकऱ्यांकडून अशीच काहीशी कमेंट केली जात आहे. खरं तर स्कूटी घेऊन आलेल्या एका मुलीला इतरत्र जायचं होतं, पण तिने ब्रेकऐवजी एक्सीलरेटर फिरवला आणि मग असं घडलं ज्याची त्या मुलीने कदाचित कल्पनाही केली नसेल. मुलगी स्कूटी घेऊन थेट मोठ्या नाल्यात पडते. आता नेटिझन्स या व्हायरल क्लिपबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्कूटी घेऊन रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसत आहे. तर शेजारीच एक मोठा नाला आहे, त्यावर एक छोटा पूल बांधलेला आहे.

बराच वेळ उभं राहिल्यानंतर मुलगी पुलाच्या दिशेने येते. पण पुढच्या क्षणी काय होतं ते पाहून लोकं हसून हसून वेडे होतायत. मात्र, अनेकजण या मुलीबाबत चिंता ही व्यक्त करत आहेत. झालं असं की, रस्ता ओलांडताना मुलगी इतकी घाबरली की ती स्कूटी घेऊन थेट नाल्यात पडली.

काही सेकंदाची ही क्लिप इन्स्टाग्रामवर गिद्दी नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत साडेतीन हजार लोकांनी लाइक केले आहे, तर अनेकांनी मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने कमेंट केली की, “ती एक महिला आहे, ती काहीही करू शकते.” तर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, “सगळी चूक ब्रिज ची आहे, कोणी काही बोलणार नाही.” आणखी एका युजरचा दावा आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियाचा आहे. युजरच्या म्हणण्यानुसार, तिथल्या बहुतांश मुलींना स्कूटी नीट चालवायला येत नाही. तसं तर इथल्या मुली एवढ्या वाईट ड्रायव्हर नाहीत त्या फक्त स्कूटीला फायटर जेट समजतात. एकूणच या व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे.