या बाप-लेकीला तोड नाय! Instagram वरची सगळ्यात फेमस जोडी

दोघेही बाथरूममध्ये नाचताना दिसले. त्यांच्यासमोर एक मोठा आरसाही होता, त्यात त्यांना एकमेकांच्या डान्स स्टेप्सही दिसत होत्या.

या बाप-लेकीला तोड नाय! Instagram वरची सगळ्यात फेमस जोडी
dad daughter duo
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 02, 2022 | 4:43 PM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल प्रत्येकालाच प्रसिद्ध व्हायचं असतं, तिथे लहान मुलांना लोकप्रिय होण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत. त्यांचा हा क्यूटनेस पाहून लोक त्यांचे चाहते बनतात. हा व्हिडिओ पाहून या बाप-लेकीच्या जोडीला पसंती मिळू लागली आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये दोघंही धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

या छोट्याशा व्हिडीओमध्ये वडील आणि मुलीने खूप धमाल केली आहे. दोघेही बाथरूममध्ये नाचताना दिसले. त्यांच्यासमोर एक मोठा आरसाही होता, त्यात त्यांना एकमेकांच्या डान्स स्टेप्सही दिसत होत्या. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पाहा…

या व्हिडीओमध्ये वडिलांच्या एक्सप्रेशनपेक्षा मुलीचं गोंडस नृत्य लोकांना जास्त आवडत आहे. या दोघांमधील ताळमेळ आश्चर्यकारक आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखता येत नाही. या दोघांचे कौतुक करून लोक थकत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चिमुकलीने स्वतःचे अनेक चाहते बनवले आहेत.

या व्हिडिओने अनेक सोशल मीडिया युजर्सचे मनोरंजन केले असून अनेक युजर्सच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक केलं आहे.कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसलेत.