
नुकताच एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. यामध्ये एक व्यक्ती सायकलवर रस्त्यावर अप्रतिम स्टंटबाजी करतोय. खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. लव्ह पॉवर नावाच्या हँडलने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एका रस्त्यावर व्यक्ती दिसत आहे. हा व्हिडिओ एका चौकातला आहे. मात्र, तो कुठला आहे याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण हा स्टंट खरोखरच पाहण्यासारखा आहे.
लोक रस्त्यावर ये-जा करत असल्याचं दिसून येत आहेत. तो माणूस प्रथम चाकांच्या सायकलवर बसतो आणि मग त्याच्या हातावर बॉल आणि प्लास्टिकच्या रिंग्स हलवू लागतो.
जगलिंगचा हा अनोखा प्रकार खूपच आश्चर्यकारक आहे. इतकंच नाही तर यासोबतच तो एका पायाची सायकल सुद्धा चालवत असतो.
wow!????????pic.twitter.com/lFq9qHRx3H
— LovePower (@LovePower_page) November 2, 2022
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दोन्ही हातांनी हा स्टंट मारत आहे. याचाच अर्थ सायकलचा तोल सांभाळण्यासाठी तो फक्त एका पायाचा वापर करत आहे. सध्या हा व्हिडिओ अधिकाधिक व्हायरल होत असून त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत.