
Viral Video: तुम्ही प्रसिद्ध युट्युबर आणि Bigg Boss ओटीटी – 3 फेम अरमान मलिक याची कहाणी तर ऐकली असेलच. त्याच्या दोन पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या. या बातमीने देशभर चर्चा झाली होती. आता एका माणसाच्या सहा बायका एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या आहेत. त्याची काय अवस्था झाली असेल याचा विचार करुनच डोकं गरगरेल. परंतू या व्यक्ती निर्धास्त आहे. त्याला याचे काही टेन्शन आलेले त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा कारनामा आफ्रीकेतील आहे. या व्यक्तीने ‘पॉलिगॅमी किंग’ ‘अकुकुडेंजर’(Polygamy King Akuku Danger) कडून प्रेरणा घेऊन अशी करामत केली आहे, त्यास ऐकून तुम्ही डोके पकडाल. अशा पद्धतीने सहा बायका एकाच घरात प्रेग्नंट असतील तर त्या घराची काय अवस्था झाली असेल याचा विचार करुन पाहा…
केनियात राहाणाऱ्या या अनाम व्यक्तीने एक साथ एक दोन नाही तर सहा – सहा लग्नं केली आहेत.(Kenya Man Six Wives) आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या सहा बायका एकाच वेळी पोटुशी राहिल्या आहेत. असे कधी आजपर्यंत ऐकायला किंवा पाहायला मिळाले नव्हते. सर्वाच्या पोटात त्याचा अंकुर वाढत असून या बायकांची तो काळजी वाहात आहे.
सोशल मीडियावर या व्यक्तीच्या घरातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याला पाहून नेटीजन्स हैराण झाले आहेत. कारण आजच्या काळात लोकांना एका मुलाला जन्म देताना इतका व्याप सहन करावा लागतो. काही जणांना तर विट्रो फर्टिलायजेशन (IVF)सारख्या आधुनिक तंत्राचा वापर करुनही मुलं होत नाहीएत. त्यात या व्यक्तीने एकसाथ सहा मुलांची बेगमी करुन ठेवली आहे.
परंतू या कारणाने त्याच्या घरातील वातावरण एक प्रकारच्या प्रायव्हेट मॅटरर्निटी होम सारखे झालेले आहे. सर्व पत्नीमध्ये ड्युडेट काही दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे या सर्व त्याच्या पत्नी बाळ होण्याची वाट पाहात आहेत. माहितीनुसार त्याची पहिली पत्नी 7 महिन्याची प्रेग्नंट आहे. तर दुसरी 6.5 महीन्यांची गर्भवती आहे.चौथी-पाचवी आणि सहावी या तीन पत्नींना पाचवा महिना लागला आहे.
मात्र, एक साथ सहा प्रेग्नंट बायकांना सांभाळण्यासाठी मोठे काळीज लागत असेल. कारण या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार सकाळी पाच वाजल्यापासून उलट्या सुरु होतात. प्रत्येक पत्नीचे डोहाळेही वेगवेगळे आहेत. त्यांची हौसमौज पुरवताना या व्यक्तीची दमछाक होत आहे. कोणाला चिंत हवी, तर कोणा कैरी अशी त्याची अवस्था आहे.त्यामुळे या व्यक्तीची अवस्था 24×7 नर्स सारखी झाली आहे.
हे कुटुंब एका आदिवासी जंगलात रहात आहे. तेथे आधुनिक सुविधाचा कोणाताही मागामूस नाहीए. यामुळे हा प्रकार आणखीनच विचित्र आणि अकल्पनीय वाटत आहे.इंस्टाग्रामवर @kenyan_statue_man नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केला असून त्यास सोशल मीडियावर खूपच पाहिले जात असून युजर निरनिराळ्या गंमतीशीर प्रतिक्रीया देत आहेत. एका विचारले की भावा कोणते डाएट घेतोस ? एकाने लिहीलंय हा माणूस त्यांना खायला काय देत असेल ? आणि हे सर्व मॅनेज कसे करत असेल.
येथे पाहा व्हिडीओ –