AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा बघा, इतका प्यायला इतका प्यायला…झेपणार नाही इतका प्यायला! रिअल स्ट्रगल VIDEO

त्याचा हा संघर्ष सोशल मीडियाच्या जनतेला खूप आवडलाय.

हा बघा, इतका प्यायला इतका प्यायला...झेपणार नाही इतका प्यायला! रिअल स्ट्रगल VIDEO
alocohol drinkingImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 22, 2022 | 4:19 PM
Share

अल्कोहोल आरोग्यासाठी हानिकारक आहे. आता हे कितीही वेळा लोकांना सांगितलं तरी काही नग असे आहेतच जे दारू शिवाय राहूच शकत नाही. पण इतकी दारू प्यावीच कशाला ज्याने स्वतःला सांभाळणं अवघड होऊन जाईल. बरेचदा लोकं इतकी पितात की त्यांना उभं देखील नीट राहता येत नाही. हा व्हायरल व्हिडिओ याचा पुरावा आहे.

एखाद्या माणसाला दारू प्यायल्यावर साध्यातली साधी, अगदी सोपी गोष्टही करायला अवघड जातंय. आता या दोघांकडेच पाहा, ज्यांनी दारू पिऊन बाईकवर जाण्यासाठी धडपड केली. त्याचा हा संघर्ष सोशल मीडियाच्या जनतेला खूप आवडलाय.

ही क्लिप 53 सेकंदांची आहे. हा माणूस दुचाकीवर बसायला जाताच तो अडखळतो आणि जमिनीवर पडतो. मात्र, कसेबसे हात हलवत तो पुन्हा उभा राहतो आणि डगमगत्या पावलांनी मोटारसायकलच्या जवळ जातो.

पुन्हा एकदा तो दुचाकीवर बसण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळी सीटवर चढण्यापूर्वी तो आपली लुंगी उचलतो, दुमडून बांधतो. पण जेव्हा तो खूप कष्ट केल्यानंतर कसा तरी त्या बाईकवर बसतो…तेव्हा तो गाडीवर आधीच बसलेल्या त्या माणसालाही घेऊन पडतो. हा व्हिडीओ भन्नाट आहे.

@JaikyYadav16 ट्विटर युझरसोबत हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले – बाईकवर बसण्यासाठी तरुण किती मेहनत घेत आहे, खरं तर हा स्ट्रगल आहे.

हा सीन पाहिल्यानंतर शेकडो युझर्सने कमेंट केलीये. एकजण लिहितो की, दोघांनाही आता काही वेळ संघर्ष करावा लागेल हे माहीत होतं. इतरांनी लिहिले की, हा दारूचा चमत्कार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.