
कधी विचार केला आहे का की कोंबडीचे एक अंड तुम्हाला किती श्रीमंत बनवू शकतं? नाही ना… आम्ही बाजारात १०-१५ रुपयांत मिळणाऱ्या साध्या पांढऱ्या किंवा तपकिरी अंड्यांविषयी बोलत नाही. जगात कोंबडीची अशी एक जात आहे जिच्या अंड्याची किंमत ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. हे कोणते तरी साधे अंडं नाही. या कोंबडीच्या अंड्याला “अंड्यांचा राजा” असे म्हटले जाते. ही कोंबडी आणि तिचे अंड फक्त जेवण नाही, तर स्टेटस सिम्बॉल असल्याचे मनाले जाते. चला जाणून घेऊया या कोंबडीविषयी..
आम्ही ज्या कोंबडीविषयी बोलत आहोत ती जगातील सर्वात महागड्या आणि दुर्मीळ कोंबडी ऐयम सेमानीशी आहे. ही इंडोनेशियामध्ये आढळणारी कोंबडी आहे. ही कोंबडी आपल्या अतुलनीय सौंदर्य आणि रहस्यमयी काळ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या कोंबडीची फक्त पिसेच नव्हे, तर चोच, हाडे, मांस आणि अगदी अंतर्गत अवयवही कोळशासारखे काळे असतात. या दुर्मीळ जनुकीय स्थितीला फायब्रोमेलॅनोसिस (Fibromelanosis) म्हणतात. हाच अनोखा गुण या कोंबडीला इतकी मौल्यवान बनवतो.
एका अंड्याची किंमत किती?
ऐयम सेमानी कोंबडीचे मांस आणि कोंबडा हजारो-लाखोंमध्ये विकला जातो तरीही त्याचे अंडे तुलनेने “स्वस्त” आहे. पण सामान्य अंड्यांपेक्षा खूपच महाग आहे. या कोंबडीचे एक पिलू २०० डॉलर (सुमारे १६,५०० रुपये) पर्यंत विकले जाते. तर एक सुपीक अंडे अमेरिका आणि युरोपियन बाजारात ३० ते ५० डॉलर (अंदाजे २,५०० ते ४,१०० रुपये) मध्ये विकले जाते. लक्षात ठेवा – ही किंमत फक्त एका पीसची आहे! कारण त्याची दुर्मीळता टिकवणे खूप अवघड असते. जगात ज्या कोंबडीची अंडी सर्वात महाग विकली जातात त्या अत्यंत दुर्मीळ असतात आणि त्यांच्याबद्दल आरोग्यदायी दावे केले जातात. इतके महाग असण्याचे मुख्य कारण म्हणजे मर्यादित पुरवठ्याच्या तुलनेत प्रचंड मागणी.
हे कोंबडेसुद्धा आहेत महागडेच
ऐयम सेमानी व्यतिरिक्तही अनेक कोंबड्या आहेत ज्यांची किंमत शौकिन आणि प्रजनकांमध्ये खूप जास्त असते. जगातील सर्वात महागड्या कोंबड्यांमध्ये ऐयम सेमानी नंतर डोंग ताओ कोंबडी आहे. डोंग ताओ कोंबडे त्यांच्या जाड-खरखरीत पायांसाठी प्रसिद्ध आहेत. व्हिएतनाममध्ये त्याची किंमत १,६६,६६० रुपयांपर्यंत पोहोचते. त्यानंतर डेथलेयर कोंबडी येते, ज्याची किंमत २०,००० रुपयांपेक्षा जास्त असते. हा उत्तम अंडी देण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय आहे. इतर महागड्या कोंबड्या लीज फायटर, ओरपिंग्टन, ओलँडस्क ड्वार्फ आणि स्वीडिश ब्लॅक यांचा समावेश आहे, ज्यांच्या किंमती ८,००० ते १२,५०० रुपये दरम्यान असतात. या साऱ्यांना त्यांच्या सौंदर्य, दुर्मीळपणा किंवा लढण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते.