Tornado Video : आकाश-पाताळ चिरत जाणारा हवेचा करवत पाहिलात का? अमेरिकेतल्या टोरनॅडोचे दृश्य कॅमेऱ्यात कैद

| Updated on: May 02, 2022 | 12:10 PM

चक्रीवादळाची (Tornado) भयाण दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाले असून हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चक्रीवादळामुळे झालेला विनाशही या व्हिडीओत पहायला मिळतोय.

Tornado Video : आकाश-पाताळ चिरत जाणारा हवेचा करवत पाहिलात का? अमेरिकेतल्या टोरनॅडोचे दृश्य कॅमेऱ्यात कैद
Tornado
Image Credit source: Twitter
Follow us on

अमेरिकेतल्या सहा राज्यांना चक्रीवादळाचा (Tornado) मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळात जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. केंटकी (Kentucky) राज्यात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी या चक्रीवादळाला राज्याच्या इतिहासातील सर्वांत भयंकर चक्रीवादळ असल्याचं म्हटलंय. या राज्यातील दोन लाखांहून अधिक घरात वीज नाहीये. चक्रीवादळाची भयाण दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाले असून हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चक्रीवादळामुळे झालेला विनाशही या व्हिडीओत पहायला मिळतोय. या वादळात ॲमेझॉन कंपनीच्या सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. चक्रीवादळामुळे ॲमेझॉनच्या वेअरहाऊसचं छत पडलं आणि त्या दुर्घटनेत या कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. (Tornado in US)

द गार्डियनच्या वृत्तानुसार, कॅन्ससच्या गव्हर्नर लॉरा यांनी सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांसाठी आपत्कालीन आणीबाणी घोषित केली आहे. तर चक्रीवादळासह हॉलब्रुक, नेब्रास्का, एंटरप्राइज आणि कॅन्सससह अनेक शहरांना गारपिटीचाही फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा चक्रीवादळाची भयाण दृश्ये-

शुक्रवारी संध्याकाळी ओक्लाहोमा विद्यापीठातून अंतराळ विज्ञान शिकणारे तीन विद्यार्थी या वादळाचा पाठलाग करत होते. मात्र याच दरम्यान एका अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये चक्रीवादळाचं रौद्र रुप पहायला मिळतंय. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मोकळ्या मैदानातून हे चक्रीवादळ उठून घरांकडे जाताना दिसत आहे. वाऱ्याचा वेग इतका आहे की त्याच्या वाटेत येणारं सर्वकाही अक्षरश: पत्त्यांसारखी उडून जातायत. चक्रीवादळामुळे असंख्या घरांची पडझड झाली आहे.