Transparent balls : हॉटेल रुममध्ये बेडच्या खाली सापडले ट्रान्सपेरेंट बॉल्स, पोस्टमध्ये म्हटलय ज्या कपलने.. सोशल मीडियावर एकच चर्चा
Transparent balls : सोशल मीडियावर एक ट्रान्सपेरेंट बॉल्स संदर्भात पोस्ट व्हायरल होत आहे. हॉटेल रुममध्ये बेड खाली हे बॉल सापडले आहेत. त्यावरुन विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. या बॉल्सचं प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घ्या.

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतं आहे. त्यात ट्रान्सपेरेंट म्हणजे पारदर्शक बॉल्सचा उल्लेख आहे. हॉटेल रुमच्या क्लिनिंग दरम्यान बेड मध्ये हे ट्रान्सपेरेंट बॉल्स मिळाले असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. जेन-जी या बॉल्सचा वापर करतात असं बोलतात. लोक आता यावर वेगवेगळ्या कमेंट्स करुन आपला अंदाज वर्तवतायत. हे बॉल्स काय आहेत? आणि ते का वापरले जातात? या व्हायरल पोस्टमध्ये ज्या बॉल्स बद्दल बोललं जातय ते काय आहेत? या बॉल्सचा कुठे वापर केला जातो? ते जाणून घ्या. एका युजरने काही टान्सपेरेंट बॉल्स शेअर करुन फोटो कॅप्शनमध्ये लिहिलय की, “हॉटेल रुममध्ये क्लिनिंग करताना बेड खाली हे ट्रान्सपेरेंट बॉल्स मिळाले. आधी हे डेकोरेशनचं मटेरियल वाटलं. पण स्टाफची प्रतिक्रिया पाहून प्रकरण थोडं वेगळं वाटलं. एक भाई बोलला हे जेन-जी ची नवीन एक्सपेरिमेंट आहे” आता ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोक विचारतायत की हे बॉल्स काय आहेत? आणि कशासाठी त्याचा वापर होतो?.
ही पोस्ट पाहून लोक वाट्टेल ते तर्क-वितर्क लावत आहेत. पण ट्रान्सपेरेंट बॉल्स म्हणजे माऊथ फ्रेशनर आहे. बाजारात आजकाल असे ट्रान्सपेरेंट बॉल्स मिळतात. माऊथ फ्रेशनर म्हणून त्यांचा वापर केला जातो. हे बॉल्स तोंडात चघळल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येत नाही. त्या शिवाय पोस्ट करणाऱ्या युजरने सुद्धा कमेंट्स करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. हे माऊथ फ्रेशनर आहे. जे युजर कल्पनाशक्तीने वेगवेगळे अंदाज बांधत होते, त्यांच्या मनातली शंका सुद्धा दूर झाल्या आहेत.
What is that? 😂
कल Hotel Room की Cleaning के दौरान Bed के नीचे ये अजीब Transparent Balls मिलीं।
पहले लगा कोई Decoration Material होगा लेकिन Staff का Reaction देखकर मामला Suspicious लगने लगा 😭एक भाई बोला “Gen Z का नया Experiment है
दूसरा बोला “भाई Google मत करना पछताओगे 😁… pic.twitter.com/xVrfJ9XPx6— Wasim Ahmed (@TheWittyWasim) May 13, 2026
अनेक हॉटेलमध्ये हे ठेवले जातात
त्या शिवाय अशा प्रकारचे रुम फ्रेशनर सुद्धा मिळतात. एअर फ्रेशनर असतात. अनेक हॉटेलमध्ये हे ठेवले जातात. त्यामुळे हवेत फ्रेशनेस राहतो. अशावेळी हे ट्रान्सपेरेंट बॉल्स रुम फ्रेशनर, एअर फ्रेशनर सुद्धा असू शकतात. रुम फ्रेशनर म्हणून जेव्हा असे बॉल्स वापरले जातात, तेव्हा ते काचेच्या भांड्यात ठेवतात. त्यामुळे वातावरणात सुगंध पसरतो. क्रिस्टल शिवाय हे वेगवेगळ्या रंगात सुद्धा येतात.