AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची भीती तेच घडतंय, रशियाचे तेल भारतात येणार नाही, फक्त आजचा दिवसच..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. अनेक देशांमध्ये तेलाचे साठे संपले असून ठणठण गोपाळा झाले. एलपीजीचे मोठे संकट आहे. त्यामध्येच आता भारतासाठी जागतिक बाजारातून अत्यंत वाईट बातमी पुढे येताना दिसत आहे.

भारताला ज्याची भीती तेच घडतंय, रशियाचे तेल भारतात येणार नाही, फक्त आजचा दिवसच..
Vladimir Putin
| Updated on: May 15, 2026 | 8:49 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहे. परिस्थिती चिघळताना दिसतंय. गेल्या दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून होर्मुज खाडी बंद आहे. ऊर्जेचे संकट आहे. अनेक देशांमध्ये तेलाचे साठे संपले आहेत. जागतिक बाजाराज तेलाचे भाव वाढत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात भारताच्या शेजारील देशात ठणठण गोपाळा आहे. त्या तुलनेत भारताकडे अजूनही मुबलक तेलसाठा शिल्लक आहे. या जागतिक संकटात भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताला हवे तेवढ्या तेलाचा पुरवठा रशियाने केला. इराण आणि अमेरिका युद्धात तेलाचा तुटवडा कमी करण्याकरिता अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवले. भारतात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल रशिया पाठवत आहे. मात्र, अमेरिकेने रशियाच्या तेलावरील काढलेले निर्बंध उद्या 16 मे 2026 रोजी संपत आहेत. त्यानंतर पुन्हा रशियाच्या तेलावर निर्बंध असतील. ज्याने भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकणार नाही.

भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत सध्याचा कच्च्या तेलाचा पुरवठा आणि परिस्थिती याबद्दल माहिती देत रशियाच्या तेलावरील निर्बंध पुढील काही दिवसांकरिता हटवण्याची मागणी केली. सध्या रशियाच्या तेलावर निर्बंध नाहीत. मात्र, वॉशिंग्टन भारतावर रशियाकडून तेल खरेदी कमी करावी, याकरिता दबाव आणत आहे. त्यामध्येच आता रशियाच्या तेलावरील काढण्यात आलेल्या निर्बंधांची तारीखही संपत आहे.

रशियाच्या तेलावरील निर्बंध काढल्यानंतर भारतीय तेल रिफायनरी कंपन्या मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. मात्र, जर अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवले नाही तर मोठे संकट उभे राहू शकते. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध फक्त त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले नाही. त्याचा फटका सर्वच देशांना बसत आहे. भारतातही मोठे परिणाम बघायला मिळत आहेत.

अमेरिकेला आता रशियाच्या तेलाबद्दल नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जर अमेरिकेने पुन्हा रशियाच्या तेलावरील निर्बंध कायम ठेवले तर ऊर्जेचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. सध्या कच्च्या तेलाचा तुटवडा बघता अमेरिका पुढील काही दिवस रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवे, असे सांगितले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष सध्या चीनच्या दाैऱ्यावर आहेत.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप