AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने पुन्हा दिला धोका, थेट खुपसले खंजीर, मोठा हाहाकार, अमेरिकेसोबतच मिळून थेट..

डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आहेत. यादरम्यानच त्यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. हा इराणसाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने मोठी खळबळ उडाली. इराणला युद्धात एकटे पाडण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे.

चीनने पुन्हा दिला धोका, थेट खुपसले खंजीर, मोठा हाहाकार, अमेरिकेसोबतच मिळून थेट..
Donald Trump and Xi Jinping
| Updated on: May 15, 2026 | 8:14 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आहेत. या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी इराणला शस्त्र देणार नसल्याचे आपल्याला सांगितल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. चीन आणि इराण यांच्यात मोठी भागीदारी आहे. इराणला चीन शस्त्र देतो. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, चीन असे करणार नाहीये. इराणसोबतच्या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा अत्यंत मोठा मानला जात आहे. फॉक्स न्यूजचा मुलाखतीमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, बीजिंगमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत चीनच्या अध्यक्षांनी इराणला शस्त्र उपकरणे देणार नाही असे म्हटले असून या मुद्द्यात सहमती झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, आम्ही या मुद्द्यावर चर्चा केली. ज्यावेळी समर्थनाबद्दल बोलले जाते त्यावेळी असे होत नाही की, तुम्ही आमच्या विरोधात युद्ध लढवावे.

त्यांनी आम्हाला सांगितले की, ते इराणला शस्त्र देणार नाहीत. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, चीन इराणकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार आहे. त्यांनी आम्हाला म्हटले की, आम्ही इराणकडून तेल खरेदी करतो आणि आम्हाला इराणकडून तेल खरेदी करायचे आहे, त्यावरही सहमती झाली. शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तेल खरेदीच्या मुद्द्यात चर्चा झाली.

चीन इराणकडून तेल खरेदी सुरू ठेवणार आहे. मात्र, चीन इराणला शस्त्र पुरवठा करणार नाही. मात्र, याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनीच भाष्य केले. चीनने यावर अजून काही खुलासा केला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची ही मोठी घोषणा म्हणावी लागेल. इराणसोबतच्या युद्धात सतत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर आरोप केला जात होता की, चीन इराणला मदत करत आहे. चीनने जर इराणला शस्त्र पुरवठा केला नाही तर इराण संकटात येऊ शकतो. चीनने इराणला पुन्हा धोका दिल्याचेही सांगितले जात आहे.

होर्मुज खाडीत काही दिवसांपूर्वीच चीनसह भारताच्या जहाजावर हल्ला करण्यात आला. चीन इराणकडून तेल खरेदी करत आहे. मात्र, अमेरिकेने इराणजवळ केलेल्या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाहीये. ऊर्जेचे मोठे संकट आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिका आणि इराण युद्ध थांबले पाहिजे, अशी जगाची मागणी आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप