AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी जंगी स्वागत… नंतर भर बैठकीत ट्रम्प यांना धमकावलं, चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी कानउघडणी करत थेट..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आहेत. मात्र, नुकताच या दाैऱ्याबद्दल धक्कादायक माहिती मिळत आहे. दोन तासांच्या बैठकीत असे काही घडले की, एकच खळबळ उडाली. अमेरिकेने ज्याचा साधा विचारही केला नाही, असे घडले आहे.

आधी जंगी स्वागत... नंतर भर बैठकीत ट्रम्प यांना धमकावलं, चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी कानउघडणी करत थेट..
Donald Trump and Xi Jinping
| Updated on: May 14, 2026 | 2:44 PM
Share

फ्रान्ससारख्या छोट्या देशाला धमकावणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांना चीनने थेट बैठकीमध्येच सळो की पळो केले. थेट डोनाल्ड ट्रम्प यांना रेड लाईन ओढून दिली. जर त्या बाहेर अमेरिका गेली तर चीन आणि अमेरिकेचे संबंध कधीच सुधारू शकत नसल्याचे चीनच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प जगातील इतर देशांना धमकावतात. मात्र, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी खडेबोल सुनावले. डोनाल्ड ट्रम्प आणि शी. जिनपिंग यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत शी जिनपिंग यांनी स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले की, जर अमेरिकेला चीनसोबत चांगले संबंध हवे असतील तर ताइवानच्या मुद्द्यापासून त्यांना लांब राहावे लागेल, तरच संबंध सुधारू शकतात. जर ताइवान प्रकरणात अमेरिकेने कोणत्याही प्रकारची चूक केली तर त्याचा थेट परिणाम दोन्ही देशातील संबंधांवर होईल. जिनपिंग यांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ताइवानच्या आसपास शांतता हवी आहे.

चीनी मिडिया सीसीटीवीच्या रिपोर्टनुसार, शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले की, ताइवानच्या मुद्द्यात सर्व व्यवस्थित झाले तर चांगले राहिल. जर त्यात काही चूक झाली तर पुन्हा संबंध खराब होतील. चीनने अमेरिकेला थेट दम दिला. हेच नाही तर चीन आणि अमेरिका या मुद्दयात एकमेकांपुढे येऊ शकतात आणि हे योग्य राहणार नाही. गेल्या काही वर्षांपासून अमेरिका ताइवानचे समर्थन करत आहे.

ज्यावर चीनला आक्षेप आहे. वन चायना पॉलिशीमध्ये ताइवान महत्वाचा हिस्सा असल्याचे चीनचे म्हणणे आहे. शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट म्हटले की, चीन आणि अमेरिकेत शांती हवी असेल तर त्यात महत्वाचे आहे की, ताइवानच्या मुद्द्यात अमेरिकेने दूर राहावे. ताइवान स्वत:ला वेगळा देश मानतो. त्यांनी अमेरिकेसोबत संबंध चांगले ठेवले आहेत.

दुसरीकडे चीन म्हणतो की, ताइवान आमचाच एक भाग आहे. ताइवान एक छोटासा हिस्सा आहे पण त्यांची अर्थव्यवस्था तगडी आहे. अनेकदा ताइवानच्या बाजूने अमेरिकेला बोलताना दिसतो. तोच राग चीनच्या मनात आहे. मात्र, आता बैठकीच्या टेबलावर ताइवानच्या मुद्दयात चीनने अमेरिकेला दम भरला. ताइवानच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी युद्धनाैका चीनने तैनात केली. ज्यावर ताइवानने आक्षेप घेतला होता. ताइवानचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे.

Follow Us
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप