AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji OTT : घरबसल्या पाहता येणार ‘राजा शिवाजी’, जाणून घ्या कुठे आणि कधी येणार पाहता?

Raja Shivaji OTT : अभिनेता रितेश देशमुख स्टारार 'राजा शिवाजी' सिनेमाने बॉक्स ऑफिस मोठा इतिहास रचल्यानंतर, सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार आहे... तर जाणून घ्या कुठे पाहता येणार सिनेमा...

Raja Shivaji OTT : घरबसल्या पाहता येणार 'राजा शिवाजी', जाणून घ्या कुठे आणि कधी येणार पाहता?
राजा शिवजी सिनेमा
| Updated on: May 15, 2026 | 8:46 AM
Share

Raja Shivaji OTT : अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर 14 दिवस झाले असले तरी, सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिला आहे. पण अनेकांना व्यस्त वेळापत्रकामुळे सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणं शक्य झालं नसेल. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे ऑनलाईन कधी प्रदर्शित होणार याच प्रतिक्षेत अनेक जण आहेत.

‘राजा शिवाजी’ला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य सिनेमांपैकी एक म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळत आहे. या ऐतिहासिक सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल सर्वत्र बरीच चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या चांगली कामगिरी करणाऱ्या सिनेमाला ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी 45-60 दिवस लागतात आणि ही अगदी सामान्य बाब आहे. पण आता ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याच प्रतिक्षेत चाहते आहेत.

सांगायचं झालं तर, सध्या पाहायचं झालं तर, सिनेमा निर्माते अनेकदा सिनेमाच्या पोस्टरमध्ये आणि प्री-क्रेडिट सीनमध्ये डिजिटल पार्टनरची माहिती उघड करतात, पण ‘राजा शिवाजी’च्या बाबतीत असं झालेलं नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘राजा शिवाजी’ हा मराठी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर थेट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. अशी माहिती समोर येत आहे. पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय प्रदर्शनाची तारीख देखील अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही.

चित्रपटगृहात ‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला. पण ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमा 6 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या 10 वर्षांपासून रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ सिनेमा करण्याचा प्रयत्न करत होता. पण तीन वेळा अभिनेत्याला अपयश आलं. पण अखेर 1 मे रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमाने मोठी कमाई देखील केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?