AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पावसाचे थैमान! रस्त्यांवर पाणीच पाणी, मुंबई गोवा महामार्गावर पाणी, पुढील 24 तास धोक्याची..

Maharashtra Rain Update : राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी मोठा इशारा दिला. राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. तीन दिवसांपासून विक्रमी पाऊस कोसळत आहे.

राज्यात पावसाचे थैमान! रस्त्यांवर पाणीच पाणी, मुंबई गोवा महामार्गावर पाणी, पुढील 24 तास धोक्याची..
Maharashtra Rain Update
| Updated on: Jul 05, 2026 | 9:28 AM
Share

राज्यात पावसाने थैमान घातले. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेज अलर्ट जारी केला. गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. सकल भागात पाणी साचले असून नद्यांना काही ठिकाणी पूर आला. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसरात अखे जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर आज मुसळधार सरी कोसळल्याने संपूर्ण परिसर धुक्याने वेढला गेला असून डोंगर-दऱ्यांमधून धबधबे वाहू लागले आहेत. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती पाणी आले आहे. मुंबई गोवा महामार्ग नागोठणे जवळील सुकेळी या ठिकाणी ठप्प झाला आहे. या ठिकाणी रस्त्यावरती पाणी आल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. मागील एक तासापासून मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात तुफान पाऊस बरसतोय. गेल्या 24 तासांत धरण साठ्यात थेट पाच टक्क्यांनी वाढ झालीये. काल दिवसभरात 96 मिलिमीटर इतका पाऊस कोसळला. धरण क्षेत्रात आत्तापर्यंत अवघे 440 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. त्यामुळं धरणात ही केवळ 23.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणात 71.48 टक्के इतका पाणी साठा होता.

भुसावळच्या हतनूर धरणाचे 16 दरवाजे 1 मीटरने उघडले हातनुर धरणातून 33 हजार 408 क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. धरण क्षेत्र आणि नदी काठावर न जाण्याचा प्रशासनाचा इशारा. कल्याण-डोंबिवलीत पावसाची पुनरागमन. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिक सतर्क, वाहतूक सध्या सुरळीत. कालच्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीतील अनेक रस्ते आणि सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

काही प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पावसाने विश्रांती घेतल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण कायम असताना पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांवर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागतो आहे. राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे.

मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा आज पुन्हा विस्कळीत झाली. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल गाड्या 8 ते 10मिनिटे उशिराने धावत आहेत. तर कल्याणहून कर्जत आणि कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेलाही उशीराचा फटका. तांत्रिक कारणांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम. हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनेनंतर रविवार असल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुरळक कमी गर्दी.

अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसात कल्याण डोंबिवलीतील अत्रे नाट्यगृह कडे येणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचले आहे. सानपाडा ते वाशी दरम्यान फुटपाथच्या मध्ये असलेल्या जॉगिंग ट्रॅक वरती दोन दिवसापूर्वी झाड कोसळ होतं. मात्र अद्यापही नवी मुबंई उद्यान विभागाने हे झाड फुटपाथ वरतीच ठेवला आहे. जॉगिंग ट्रक वर झाड कोसळ होतं तेव्हा जॉकिंग करणार वर्ग इकडे नव्हता त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?